Laal Singh Chaddha: 'मैंने कहा था एक दिन मैं हसूंगा तुम रोओगे!' चतूरच्या मीम्सचा कहर |Laal Singh Chaddha Aamir Khan Trolled 3 Idiots Chatur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Laal Singh Chaddha trolled

Laal Singh Chaddha: 'मैंने कहा था एक दिन मैं हसूंगा तुम रोओगे!' चतूरच्या मीम्सचा कहर

Laal Singh Chaddha: आमिरला आता चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे. यंदा त्याला लाल सिंग चढ्ढानं चांगलचं रडवल्याचे दिसून आले आहे. (Laal Singh Chaddha meme viral) यापूर्वी आमिरच्या कोणत्याही कलाकृतीला प्रेक्षकांचा एवढा विरोध झाला नव्हता तेवढा तो आता झाला आहे. त्याच्या लाल सिंग चढ्ढाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. आमिरला या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र त्याला प्रेक्षकांचा म्हणावा असा प्रतिसाद काही मिळाला नाही. (Aamir Khan News) त्यालाच नव्हे तर बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या रक्षाबंधनला देखील प्रेक्षकांनी नाकारले. सोशल मीडियावर बॉयकॉट लाल सिंग (Boycott Laal Singh chaddha) चढ्ढा आणि बॉयकॉट बॉलीवूडच्या ट्रेंडनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

यासगळ्यात आता 3 एडियट्समधील चतुरचे काही मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका फोटोत चतुर आणि दुसऱ्या फोटोत आमिर अशाप्रकारे आमिरची खिल्ली उडवण्यात आली आहे. राजकुमार हिरानीच्या थ्री इडियट्सला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. बॉलीवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये थ्री इडियट्सचे नाव हे आवर्जुन घेतले जाते. त्यात इंजिनिअरींग कॉलेजच्या फाउंडेशन कार्यक्रमात कुलगुरुंची खिल्ली उडवतानाचा एक सीन आहे. त्यात चतुरनं भाषण करत धमाल उडवून दिली होती. आता त्याच प्रसंगातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यातून आमिरला शेरेबाजी केली जात आहे.

आमिरच्या लाल सिंग चढ्ढानं अकरा दिवसांत 55 कोटींची कमाई केली आहे. यावरुन त्याच्या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद कसा आहे हे लक्षात येईल. आमिरला पहिल्यांदाच अशाप्रकारच्या अपयशाचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावरून त्याच्यावर नेटकऱ्यांनी तीव्र शब्दांत राग व्यक्त केला आहे. आम्हाला त्याचा चित्रपट पाहायचाच नाही. अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारे आमिरला ट्रोल केले जात आहे. त्याच्या लाल सिंद चढ्ढाची खिल्ली उडवण्यासाठी भन्नाट मीम्स देखील व्हायरल झाले आहेत.

Laal Singh Chaddha Meme

Laal Singh Chaddha Meme

Laal Singh Chaddha Meme

Laal Singh Chaddha Meme

हेही वाचा: Liger : माईक टायसनचा एकच ठोसा, विजयला दिसले तारे! 'अजुनही...'

चतुरचं मीम्स देखील त्यापैकी एक आहे. चतुर फेम ओमी वैद्यच्या त्या मीम्सनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ओमीचा त्यात एक संवाद होता. तो असा की... 'एक दिन तुम सब रोओगे और मैं हंसूंगा'।' आता ओमीचे ते मीम्स व्हायरल झाले असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यावरुन आमिरवर शेरेबाजी सुरु झाली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून आमिरच्या लाल सिंग चढ्ढावर नेटकऱ्यांनी सडकून टीका केली आहे.

हेही वाचा: Laal Singh Chaddha: आमिरच्या 10 चूका! त्या टाळल्या असत्या तर...

Web Title: Laal Singh Chaddha Aamir Khan Trolled 3 Idiots Chatur Fame Omi Vaidya Memes Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..