'अन्यथा 6 महिन्यात तुझा मृत्यू अटळ...', जेव्हा डॉक्टरांनी अदनानला दिला होता अल्टिमेटम Adnan Sami | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood: 'Was given 6 months to live': Adnan Sami talks about life

Adnan Sami: 'अन्यथा 6 महिन्यात तुझा मृत्यू अटळ...', जेव्हा डॉक्टरांनी अदनानला दिला होता अल्टिमेटम

Adnan Sami:प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामीला आपल्या सुरेल आवाजासोबतच जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन बद्दलही ओळखलं जातं. अदनानने जेव्हा हिंदी फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री केली तेव्हा तो प्रमाणापेक्षा अधिक जाड होता. त्याचं वजन तेव्हा तब्बल २०० किलोहून अधिक होतं आणि त्या वजनामुळे त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अर्थात स्वतःला फिट करण्यासाठी त्यानं आपलं जवळपास १६० किलो वजन कमी केलं होतं. आता अदनान सामीनं एक मोठा खुलासा करताना सांगितलं आहे की वजनामुळे डॉक्टरांनी त्याला फक्त ६ महिने जगशील असा अल्टिमेटम दिला होता.(Bollywood: 'Was given 6 months to live': Adnan Sami talks about life)

हेही वाचा: Prajakta Mali: गुलाब लाल..आकाश निळं अन् आमची प्राजू..

अदनानने सांगितलं की जाडसर पणामुळे त्याच्या आयुष्यात अशी वेळ आली होती की तो साधं झोपूही शकत नव्हता. त्याला बसून झोपावं लागायचं. अदनान म्हणाला की,त्यावेळी त्याला त्याचे पाय देखील हलवता यायचे नाहीत. त्याच्या ड्रायव्हर्सना त्याला गाडीत कसं बसवायचं यासाठी ट्रेनिंग दिलं गेलं होतं. ड्रायव्हर अदनानच्या पायांना उचलून गाडीत ठेवण्यासाठी मदत करायचे.

हेही वाचा: Prajakta Mali: एकच फोटो..विषय संपला..

एका मुलाखतीत डॉक्टरांनी दिलेल्या त्या अल्टिमेटमविषयी बोलताना अदनान म्हणाला,''डॉक्टरांनी मला सांगितले होते की मला या गोष्टीमुळे मुळीच आश्चर्य वाटणार नाही जर तुझ्या आईलडिलांना सहा महिन्यानंतर कुठल्याशा हॉटेलच्या रुममध्ये तू मृत अवस्थेत सापडलास तर. मी डॉक्टरांच्या त्या बोलण्याला कधीच विसरू शकता नाही..आजही ती वाक्य आठवली की माझं काळीज धडधडतं,मन सुन्न होतं''.

हेही वाचा: Manasi Naik: जिंकलस मानसी, घटस्फोटानंतरही असं तेज..

अदनान सामीच्या म्हणण्यानुसार,त्यावेळी अनेक लोक त्याला क्यूट आणि गोलू मोलू बोलायचे,पण त्या गुबगुबीत पणामुळे तो खूप मोठ्या अडचणींचा सामना त्यावेळी करत होता. तो म्हणाला, ''मला स्लीप एपनिया होता. मी आडवं पडून झोपू शकत नव्हतो. कितीतरी वर्ष मी बसून झोपलोय. एक वेळ अशी आली होती की,जेव्हा मी गाडीत बसण्यासाठी माझ्या पायांना देखील उचलू शकत नव्हतो. माझ्या ड्रायव्हर्सना माझे पाय कसे उचलायचे आणि गाडीत ठेवायचे याचं ट्रेनिंग दिलं गेलं होतं.मी गाडीच्या जवळ आलो की ते अगदी अलगद माझ्या पायांना उचलून गाडीच्या आत ठेवायचे''.

अदनाननं तो काळ शेअर केला जेव्हा त्याचं वजन २३० किलोच्या जवळपास पोहोचलं होतं. अदनान म्हणाला, तेव्हा तो ब्राउनी अशा पद्धतीनं खायचा जसं शेंगदाणे खातात. ते व्हा मी बाऊनी खाताना ,लोक व्हिडीओ बनवायचे. आज मला पाहून त्यांना विश्वास बसत नाही की मी इतका बारीक झालो.

हेही वाचा: Janhvi Kapoor: जान्हवीची तऱ्हा.. झगामगा.. मला बघा..

९० च्या दशकात अदनान सामीची 'लिफ्ट करा दे' आणि 'कभी तो नजर मिलाओ' या गाण्यांनी लोकांवर जादू केली होती. याव्यतिरिक्त त्यांचे 'तेरा चेहरा' हे गाणं देखील खूप प्रसिद्ध झाले होते. आज अदनान सामी ५० वर्षांचा झाला आहे. त्यानं स्वतःमध्ये खूप सारे बदल केले आहेत. आपल्या फिटनेसविषयी तो अधिक सजग झाला आहे. सध्या अदनान सामी चे वजन ७५ ते ८० किलोच्या आसपास आहे.