'Campervan' मध्ये राहणारा बॉलीवूडचा पहिला अभिनेता बनला हर्षवर्धन राणे..थेट हॉलीवूडच्या पंक्तीत जाऊन बसला Harshvardhan Rane childhood dream gift himself campervan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Harshvardhan Rane childhood dream gift himself campervan

'Campervan' मध्ये राहणारा बॉलीवूडचा पहिला अभिनेता बनला हर्षवर्धन राणे..थेट हॉलीवूडच्या पंक्तीत जाऊन बसला

Harshvardhan Rane: सध्या हर्षवर्धन राणेचं नाव थेट हॉलीवूडच्या बड्या सेलिब्रिटींशी जोडलं जात आहे. अर्थात कारणही तसंच आहे. हर्षवर्धन राणेजवळच्या 'कॅम्परवॅन' मुळे त्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. आता अर्थात आपल्यापैकी अनेकांना 'कॅम्परवॅन' काय प्रकार आहे बरं,ज्याच्यामुळे हर्षवर्धन राणे बॉलीवूडचा असा पहिला अभिनेता बनला आहे ज्याच्याकडे कॅम्परवॅन आहे,आणि अर्थात नावाजला जातोय. चला त्याच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. (Harshvardhan Rane childhood dream gift himself campervan)

हेही वाचा: KRK: 'सुशांत सिंग राजपूत सारखेच मलाही...', केआरके च्या नव्या ट्वीट्सनी सोशल मीडियावर खळबळ...

हर्षवर्धन राणेला निसर्गा विषयी असलेलं प्रेम आणि आयुष्याकडे त्याचा पहायचा सकारात्मक दृष्टीकोन हे त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून अनेकदा दिसून येतो. आता त्यानं निसर्ग आणि आपलं आयुष्य यामधील बॉन्ड अधिक घट्ट करत एक नवीन घर खरेदी केलं आहे,जे निसर्गाच्या खूप जवळ हर्षवर्धनला ठेवेल. हो,यात एक शॉकिंग ट्विस्ट आहे बरं का. १६ डिसेंबरला हर्षवर्धनने आपला वाढदिवस साजरा केला ज्यावेळी त्यानं स्वतःला हे खास घर गिफ्ट केलं आणि अर्थात तो लवकरच या घरात शिफ्ट होणार आहे.

हेही वाचा: FIFA: अर्जेंटिनानं जसा फिफा वर्ल्डकप जिंकला तसं सोशल मीडियावर अक्षयची फिरकी घेऊ लागले लोक..म्हणतायत..

आता हे कळल्यावर आपण थक्क व्हाल की अभिनेत्याचं हे नवं घरं सर्वसाधारण घरासारखं मुळीच नाही,ते एक कॅम्परवॅन आहे,म्हणजे चालतं-फिरतं घर. ज्याला तो आपल्या आवडत्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो आणि तिथल्या निसर्गाचा आनंद अनुभवू शकेल. या कॅम्परवॅन मधून सहलीचा आनंद लुटायला अभिनेता हर्षवर्धन खूपच उत्साही आहे. या कॅम्परवॅनमुळे त्याचं लहानपणी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं आहे. तब्बल १२ वर्ष आणि ७ महिन्याच्या मोठ्या प्लॅनिंग नंतर हर्षवर्धनचं हे घर पूर्ण झालं आहे.

हेही वाचा: Deepika Padukone: 'बिकिनी भगवी नाही चिश्ती रंगाची..', आता मुस्लिम संघटना पेटल्या...

खरंतर, याआधीही हर्षवर्धनने आपल्या जीपमधनं रोड ट्रीपचा आनंद लुटला आहे. पण आपल्या स्वप्नपूर्तीच्या माध्यमातून तो वास्तवात पहिल्यांदा नोमेडच्या लाइफस्टाइलला प्रमोट करताना दिसणार आहे. अभिनेत्यानं स्वतःशी निश्चय केला आहे की जोपर्यंत त्याचा आगामी 'सनम तेरी कसम २' सिनेमा रिलीज होत नाही तोपर्यंत तो या कॅम्परवॅन मध्येच राहणार आहे आणि एक सर्वसाधारण जीवनशैली जगण्याचा प्रयत्न करणार आहे.

हेही वाचा: Ankita Lokhande: कोण म्हणतं अंकिताला अभिनेत्री बनायचं होतं..तिला तर.., जाणून घ्या Unknown Fact

यासोबतच हर्षवर्धन भारताचा पहिला अभिनेता बनेल जो मोठमोठ्या आलिशान घरांना सोडून कॅम्परवॅन मध्ये राहिल. हॉलीवूडमध्ये असे कितीतरी बडे सेलिब आहेत ज्यांनी रस्त्यावर अशाप्रकारे जगण्याचा आनंद अनुभवला आहे. शैलीन वुडली, विल स्मिथ, साइमन कॉवेल, एश्टन कचर आणि पत्नी मिला कुनिस और विन डीजल यांचा यात समावेश आहे.

पण भारतीय सिनेइंडस्ट्रीत असं पहिल्यांदाच घडणार आहे. यावर्षी हर्वर्धनला 'तारा वर्सेस बिलाल' मध्ये पाहिलं गेलं होतं. लवकरच हा सिनेमा ओटीटी वर रिलीज होईल. हर्षवर्धननं नुकतेच संजय गुप्ता यांच्या स्पोर्ट्स ड्रामाचे शूटिंग पूर्ण केले आहे. सध्या बिजॉय नांबियार यांच्या 'दंगे' सिनेमाचं शूटिंग तो करत आहे आणि त्यानंतर 'सनम तेरी कसम २' चे शूटिंग सुरू होणार आहे.