Hemangi Kavi: आलियानंतर मराठमोळी हेमांगी म्हणते, ‘मेरे घर आया एक.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hemangi Kavi

Hemangi Kavi: आलियानंतर मराठमोळी हेमांगी म्हणते, ‘मेरे घर आया एक...

हेमांगी कवी हे मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नावं आहे. अनेक मालिका, चित्रपट, नाटकात तिने तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. अभिनयासोबतच निरनिराळ्या कारणाने ती चर्चेत असते. ती अत्यंत परखडपणे आपले पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहचवत असते. प्रत्येक विषयावर आपलं रोखठोक मत ती मांडत असते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.तिची एक पोस्ट सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. यात तिने तिच्या घरी नवा पाहुणा आल्याचं म्हंटलयं.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि विनोदी अभिनेता कुशल बद्रिकेने तिच्या घरी आला होता. यावेळचा एक फोटो पोस्ट करत तिने लिहिलंय, 'मेरे घर आया एक ‘नन्हा परा’! माझी ही शाब्दिक कोट्यांची नॉनसेंन्सगिरी जगात कुणाला कळली असेल तर हा माणुस आणि म्हणुनच त्याने ती ‘ए ए वेडा बाई’ म्हणत फु बाई फु मध्ये उचलून धरली होती, वर्क झाली होती. आज ही आमच्या जोडीला मिस केलं जातं ही त्याचीच पावती आणि तसंही हा नन्हा पराच आहे कारण हा सतत म्हणत असतो ना आपल्या आत एक लहान मुल दडलेलं असतं वगैरे'

हेही वाचा: 'मी ट्रोलर्सला घाबरत नाही, करियर संपण्याची भीती मला नाही..' हेमांगी कवी..

पुढे ती लिहिते, 'याच्या बाबतीत ते लहान मुल फक्त आत नाही तर बाहेरही बागडतय. फक्त त्याला हे माहीत नाही एवढंच. आणि कधी माहीत ही होऊ नये हीच इच्छा!,मित्र- मैत्रिणी, यार, फ्रेंड्स बरेच असतात पण ‘दोस्त’ या शब्दाचा खरा अर्थ जगणारा एक नन्हासा, प्यारासा अनफिल्टर्ड दोस्त! कुशल ऐसेही रह मेरे पगले! काम तर वाजवतोसच तु, वाद्य ही वाजवत रहा (खुप छान गिटार वाजवली काल त्याने), छान छान लिहीत रहा, भारी भारी सुचत राहो तुला!'

हेही वाचा: Viral Post: हेमांगी कवी म्हणते, 'औकात में रेह!' पोस्टची तळटीप चर्चेत

‘दोस्त येती घरा तोची दिवाळी दसरा! त. टी. : आज काय त्याचा birthday वगैरे नाहीए याची मंडळाने नोंद घ्यावी. मला वाटलं लिहावंसं त्याच्या विषयी म्हणून लिहीलं.’ अशी टिपणीही तिने या पोस्टसोबत दिली आहे.