'बॉन्ड गर्ल' तान्या रॉबर्ट्सच्या निधनाच्या बातम्या खोट्या, अभिनेत्री आहे जिवंत मात्र प्रकृती गंभीर

दिपाली राणे-म्हात्रे
Tuesday, 5 January 2021

तान्या रॉबर्ट्सला लॉस एंजेलिसच्या सीडर सीनाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं जिथे ३ जानेवारीला तिचं निधन झाल्याचं म्हटलं गेलं. 

मुंबई- १९८५ च्या 'जेम्स बॉन्ड' सिनेमाची 'बॉन्ड गर्ल' आणि 'अ व्ह्यु टू अ किल'मध्ये रोजर मूरसोबत स्टेसी सौटनची भूमिका साकारणारी अभिनेत्री तान्या रॉबर्स्ट्सचं निधन झाल्याची नुकतीच बातमी समोर आली होती. रिपोर्ट्सनुसार तान्या  रॉबर्ट्स ख्रिसमसच्या दिवशी संध्याकाळी तिच्या पाळीव कुत्र्यांसोबत फिरुन परतली आणि घरात बेशुद्ध पडलेली दिसली. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तान्या रॉबर्ट्स ६५ वर्षांची असून तिला लॉस एंजेलिसच्या सीडर सीनाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं जिथे ३ जानेवारीला तिचं निधन झाल्याचं म्हटलं गेलं. 

हे ही वाचा: 'भाबीजी घर पर है'मध्ये अनीता भाबीच्या भूमिकेत झळकणार 'ही' मराठमोळी अभिनेत्री

मात्र आता अशी बातमी समोर येत आहे की तान्या रॉबर्ट्सच्या निधनाच्या बातम्या चूकीच्या होत्या. रॉबर्ट्स अजुनही जिवंत आहे आणि सध्या ती त्याच हॉस्पिटलमध्ये आयसीयुमध्ये दाखल आहे. तिच्या तब्येतीत फारशी काही सुधारणा नाहीये. तान्याच्या मित्रमैत्रीणीपैकी एकाने तिच्या निधनाची बातमीला दुजोरा दिला होता. मात्र नंतर असं कळालं की  तान्याच्या प्रवक्त्याने रविवारी चुकून तिच्या निधनाची बातमी दिली. रॉबर्ट्स अजुनही जिवंत आहे. 

तान्या रॉबर्ट्सचा दिर्घकाळापासून प्रतिनिधी असलेल्या माइक पिंगेलने ती जिवंत असण्याला दुजोरा दिला आहे. सोबतंच त्याने तिचे हेल्थ अपडेटही देत म्हटलं आहे की, 'ती अजुनही आयसीयुमध्ये दाखळ आहे मात्र तिच्या प्रकृतीत फार सुधारणा नाहीये. एका गैरसमजामुळे तिच्या निधनाची बातमी दिली गेली.'तान्या रॉबर्ट्सने 'अ व्यु टू अ किल' व्यतिरिक्त काही टीव्ही शो देखील केले आहेत.   

bond actress tanya roberts is still alive death news are falls but is in the icu


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bond actress tanya roberts is still alive death news are falls but is in the icu