बोनी कपूर मुली जान्हवी, खुशीसह क्वारंटाईन, घरातील नोकर निघाला कोरोना पॉझिटीव्ह

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

निर्माते बोनी कपूर यांच्या घरापर्यंत कोरोना येऊन पोहोचला आहे. बोनी कपूर यांच्या घरातील नोकर कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. 

मुंबई-  कोरोना व्हायरचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारतात देखील गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन सुरु आहे. सामान्य माणसांसोबतंच सेलिब्रिटी देखील याला अपवाद नाहीत. बॉलीवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी क्वारंटाईन आहेत. अशांतच आता सिने इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांच्या घरापर्यंत कोरोना येऊन पोहोचला आहे. बोनी कपूर यांच्या घरातील नोकर कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. 

हे ही वाचा: अमिताभ-आयुष्मान स्टारर 'गुलाबो सिताबो'चा मजेशीर टिझर रिलीज

रिपोर्ट्सनुसार बोनी कपूर यांनी सांगितलं आहे की, त्यांच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील घरात काम करणा-या २३ वर्षीय चरण साहूची कोविड-१९ टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. साहू गेल्या शनिवारपासून आजारी होता. ज्यानंतर बोनी कपूर यांनी त्याला कोरोना व्हायरसची टेस्ट करण्यासाठी पाठवलं. त्याची टेस्ट पॉझिटीव्ह आल्याने त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. यानंतर बोनी कपूर यांनी सोसायटीतील सदस्य आणि बीएमसीच्या अधिका-यांना याबाबत सूचना दिली. 

बोनी यांनी माहिती दिल्यानंतर लगेचच बीएमसी आणि राज्य सरकारचे अधिकारी लोक तिथे पोहोचले आणि साहूला क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी घेऊन गेले. बोनी यांनी सांगितलं की ते स्वतः, दोन्ही मुली आणि इतर स्टाफ पूर्णपणे व्यवस्थित आहेत. त्यांनी कोणतीच लक्षणं नाही आहेत. एवढंच नाही तर त्यांनी हेही सांगितलं की लॉकडाऊन झाल्यानंतर घरातील कोणताच सदस्य घराबाहेर गेलेला नाही. त्यांना चरण साहु देखील लवकरच बरा होऊन येईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 

बॉलीवूडमध्ये सगळ्यात आधी प्रसिद्ध गायिका कनिका कपूर कोरोना पॉझिटीव्ह म्हणून समोर आली होती. ती लंडनवरुन लखनऊला तिच्या घरी परतली होती. त्यानंतर निर्माते करीम मोरानी आणि त्यांच्या दोन मुली कोरोना पॉझिटीव्ह आल्या होत्या. तर नुकतेच अभिनेते फेड्री दारुवाला यांचे वडिल देखील कोरोना पॉझिटीव्ह आले होते.   

boney kapoor house help found corona positive  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boney kapoor house help found corona positive