या अभिनेत्रींचा असा आहे क्वारंटाईन अनुभव, कोण आहे ती अभिनेत्री... आणि काय म्हणतीय ती ? 

Boney Kapoor, Janhvi and Khushi's quarantine ends
Boney Kapoor, Janhvi and Khushi's quarantine ends

मुंबई : करोनाच्या दिवसात अनेक ठिकाणी करोना विषाणूची लागण सुरू आहे. त्यात सिनेसृष्टीतील कलाकारांच्या घरात म्हणजे बोनी कपूर यांच्या घरात काम करणा-या तीन व्यक्तींना  करोना व्हायरसची लागण झाली होती. त्यामुळे त्यांचे सर्व  कुटुंब होम क्वारंटाईन झाले होते. बोनी यांची मुलगी आणि अभिनेत्री जान्हवी कपूर मुलाखत देताना तिचा क्वारंटाईनचा अनुभव कसा आहे ते सांगितली आहे.

यावेळी जान्हवीने असे  सांगितले की, आम्ही सर्वजण आमच्या घरी लॉकडाउनचे दिवस एन्जॉय करत होतो. कारण आम्हा सर्वांना एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली होती. खरं तर करोनामधील या दिवसात टीव्ही आणि सोशल मीडियाद्वारे सगळ्या गोष्टी ऐकत होतो. मात्र स्वत:च्या घरातच करोनाग्रस्त सापडल्यामुळे आम्ही घाबरून गेलो. आम्ही सर्वजण घराच्याबाहेर देखील गेलो नव्हतो. तरीसुद्धा करोना आमच्या घरात पोहोचला होता, यामुळे आम्ही सर्वजण सुरुवातीचे काही दिवस खूप घाबरुन गेलो होतो.

क्वारंटाईनमधील अधिकाधिक वेळ वडिलांसोबत घालवला. या करोनामुळे आम्हाला सर्वांना सावरायला दोन दिवस लागले. या दिवसात घरातील प्रत्येक सदस्य आपापल्या खोल्यांमध्ये बसून राहत होते. माझ्या वडिलांना रात्री झोपताना गरम पाणी पिण्याची सवय आहे. त्यांना पाणी देण्यासाठी मी  हातात हॅन्डग्लोज आणि तोंडावर मास्क लावूनच  त्यांच्याकडे पाणी घेऊन जायचे. वडील दिवसातून तीन ते चार वेळा गरम पाण्याची स्टीम घेत आहे. आमच्या घरातील प्रत्येक कर्मचाऱ्याला तोंडावर मास्क लावणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आम्ही स्वच्छतेवर अधिक लक्ष देतोय, असेही जान्हवीने सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून बोनी कपूर यांच्या घरी काम करणा-या एका व्यक्तीला  १९ मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आणखी दोन सदस्यांना या करोनाची लागण झाली होती. हे तिघेही बोनी यांच्याच घरी वास्तव्याला आहेत. ५ जून रोजी बोनी यांनी ट्विट करुन त्यांच्या घरातील सदस्यांनी करोनावर मात केल्याची घोषणा केली होती. त्यांनी असे ट्विटमध्ये केले की, मला हे सांगताना आनंद होतोय की, आमचे तीन स्टाफ सदस्य ज्यांना करोनाची  लागण झाली होती, ते आता बरे झाले असून त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

माझी आणि माझ्या मुलींची टेस्ट यापूर्वीच निगेटिव्ह आली होती. आमचा १४ दिवसांचा क्वारंटाईन काळदेखील संपला आहे आणि आता आम्ही नवी सुरुवात करण्यास सज्ज आहोत', असे बोनी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे. जान्हवी आणि बोनी कपूरनी क्वांरटाईनमधील आपला अनुभव सांगितला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com