
Boycott Bramhastra Movie: सोशल मीडियावर आता ब्रम्हास्त्रला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. बॉयकॉट बॉलीवूडचा ट्रेंड हा गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. त्यात आमिर खान भरडला गेला. त्याच्या लाल सिंग चढ्ढाला (social media viral news) प्रेक्षकांकडून नकारात्मक प्रतिक्रिया आल्या होत्या. तसेच अक्षय कुमारला देखील मोठा फटका बसला होता. त्याचा रक्षाबंधन नावाचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळला होता. अशा परिस्थितीत बॉलीवूडच्या (bollywood movies) निर्मात्यांना चित्रपट रिलिज करण्याची भीती वाटू लागली आहे. असे वातावरण सध्या दिसत आहे. त्यातच रणबीरच्या ब्रम्हास्त्रवर काही धार्मिक संघटनांनी टीका केली आहे.
ब्रम्हास्त्रचे दिग्दर्शक अयान मुखर्जी, रणबीर कपूर, आलिया भट्ट हे महाकालच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्याठिकाणी त्यांना आलेला अनुभव भयानक होता. त्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना मंदिरात जाण्यास मज्जाव केला होता. अशी माहिती सुत्रांनी दिली होती. यासगळ्याचे सोशल मीडियावर जोरदार पडसाद उमटल्याचे दिसून आले आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या घटनेचा निषेध केला असून सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो ट्विट करुन आपली परखड प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडियावर बॉयकॉट ब्रम्हास्त्र ट्रेंड होत आहे. त्यावरुन वेगळ्याच चर्चेला तोंड फुटल्याचे दिसून आले आहे. उज्जैनमध्ये तर आलिया - रणबीरला प्रवेश नाही. असे फलक लावण्यात आले होते. यावर शिवसेनेच्या खासदार प्रियंका यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आलिया - रणबीरची बाजू घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आलिया - रणबीरचा एक जुना फोटो त्यांनी ट्विट केला आहे. तो फोटो शेयर करताना त्यांनी त्यावर कॅप्शनही लिहिली आहे. त्यात त्या म्हणतात, हा फोटो तुमची काहीही मदत करणार नाही. तो शांत राहिल..
उज्जैनच्या मंदिरात आलिया - रणबीरला प्रवेश न देणे ही लज्जास्पद गोष्ट आहे. राजकारण किती खालच्या थराला जाते आहे हे त्यावरुन दिसून येत आहे. आता तर कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी वाद होणं हा एक ट्रेंडच झाला आहे. लॉबिंग करुन चित्रपटांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून आले आहे. असेही प्रियंका यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.