Boycott Indian Idol 13: आता बस्स! इंडियन आयडॉल 'बॉयकॉट'! नेटकऱ्यांचा संताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Boycott Indian Idol 13

Boycott Indian Idol 13: आता बस्स! इंडियन आयडॉल 'बॉयकॉट'! नेटकऱ्यांचा संताप

Boycott Indian Idol 13: नेटकऱ्यांनी कधी काय खटकेल याचा भरवसा नाही. आता ते प्रसिद्ध टीव्ही मनोरंजन शो इंडियन आयडॉलवर संतापले आहे. त्यांनी या शो वर बहिष्काराची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडला बॉयकॉट करण्याची सातत्यानं मागणी होताना दिसतेय. याचा फटका प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आणि अक्षय कुमारला बसला होता. त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी नाकारले होते. ते प्रकरण कुठे शांत होत नाही तोच आता इंडियन आयडॉलवर बहिष्कार घातला जावा असे नेटकरी म्हणू लागले आहेत.

गेल्या दीड दशकांहुन अधिक काळ इंडियन आयडॉल या मालिकेनं चाहत्यांची पसंती मिळवली आहे. त्याला मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. बऱ्याचदा हा शो त्यातील परीक्षक आणि त्यांच्या आडमुठेपणामुळे चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. सध्या या शोमधून अन्नु मलिक यांना निरोप देण्यात आला असून प्रसिद्ध संगीतकार विशाल ददलानी, नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया यांना परिक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यापासून या परिक्षकांनी त्यांच्या वागण्या बोलण्यात बदल केल्याचे दिसून आले आहे.

सध्या इंडियन आयडॉलचा तेरावा सीझन सुरु आहे. त्यातील काही गोष्टी या स्क्रिप्टेड असल्यानं नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचा परिणाम हा प्रेक्षकांच्या मनोरंजनावर होत असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. सगळचेच जर स्क्रिप्टेड असेल तर मग तो शो पाहण्यात काय मजा....दरवेळी ते रडणे, एखाद्याला बोलणे, अमुक एखाद्या कंटेस्टंला फेव्हर करणे यामुळे त्या शोचा टीआरपी कमी होतोय. अशी नाराजी प्रेक्षक सोशल मीडियावरुन व्यक्त करु लागले आहेत.

हेही वाचा: Nikki Tamboli: 'ही' निक्की तांबोळी आहे तरी कोण?

हेही वाचा: Sharad Ponkshe: 'पैसे संपले, आता मिठाई विकतो!' शरद पोंक्षेंचा नवा बिझनेस

आता फायनल 15 स्पर्धकांची अंतिम यादी समोर आली आहे. त्यामध्ये सोनाक्षी कर, नवदीप वडाली, प्रितम रॉय, देबोस्मिता रॉय, सेंजुती दास, चिराग कोटवाल, यांच्यासह इतर स्पर्धकांच्या नावांचा समावेश आहे. या यादीमध्ये रितो रिबाचे नाव नसल्यानं चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा शो आता बॉयकॉट करण्याची वेळ आली आहे. असा आक्रमक पवित्रा नेटकऱ्यांनी घेतला आहे.

हेही वाचा: Raveena Tondon: रविनानं पुन्हा धरलं बाळसं! कसली दिसतीये...