Besharam Rang Song: बॉलीवूडची ही गाणीही ठरली होती वादाचा विषय... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pathaan Besharam Rang

Besharam Rang Song: बॉलीवूडची ही गाणीही ठरली होती वादाचा विषय...

सध्या शाहरुख खानचा आगामी पठाण चित्रपटातील 'बेशरम रंग' गाण्यावरून देशभरात वादाला तोंड फुटले आहे. बेशरम रंग हे गाणे काही दिवसांपूर्वी रिलीज झाले असून या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे खळबळ उडाली आहे कारण अभिनेत्रीच्या भगव्या रंगामूळे हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असं बोललं जात आहे.

भाजपपासून विश्व हिंदू परिषदेपर्यंत इतकच नव्हे तर मुस्लिम संघटना आणि अनेक इतर संघटनांनी या चित्रपटाला विरोध केला आहे. मात्र बॉलीवूडमध्ये एखाद्या गाण्याच्या शब्दाला किंवा वेशभूषेवरुन वाद होणं काही नवीन नाही आहे. या आधीही बॉलिवूड गाण्यावरुन वाद रंगला आहे.

'जुम्मा चुम्मा दे दे'

'जुम्मा चुम्मा दे दे'

'जुम्मा चुम्मा दे दे'

1991 मध्ये आलेल्या 'हम' चित्रपटातील. 'जुम्मा चुम्मा दे दे' हे गाणं बिग बी आणि किमी काटकर यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. या गाण्यावर अश्लीलता पसरवल्याचा आरोपही करण्यात आला होता. तसेच, गाण्यात जुम्मा हा शब्द वापरण्यावरूनही बराच गदारोळ झाला होता. मात्र, हे गाणे हिट झालं आणि अजूनही वाजतयं.

'चोली के पीछे क्या है '

'चोली के पीछे क्या है '

'चोली के पीछे क्या है '

1993 मध्ये आलेल्या 'खलनायक' चित्रपटातील ' चोली के पीछे क्या है' या गाण्यामुळे चित्रपटाला बरीच प्रसिद्धी दिली आणि तो हिट होण्यास मदत केली, परंतु हे गाणे त्याच्या शब्दांमुळे वादात सापडले होते. या गाण्यावर अश्लीलता पसरवल्याचा आरोप करण्यात आला होता.

हेही वाचा: Boycott Pathaan: "दिपिकाची भगवी बिकीनी सहन करणार नाही",मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा भडकले...

'राधा तेरी चुनरी''

'राधा तेरी चुनरी''

'राधा तेरी चुनरी''

आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि वरुण धवन यांचा पहिला चित्रपट 'स्टुडंट ऑफ द इयर', जो २०१२ साली रिलिज झाला होता, त्यातही गाण्यांबाबत वाद निर्माण झाला होता. चित्रपटातील 'राधा तेरी चुनरी राधा तेरा छल्ला ' या डान्स नंबरवरून बराच गदारोळ झाला होता. गाण्यात राधा हा शब्द वापरण्यात आल्याने बराच वाद झाला होता.

हेही वाचा: Pathaan: 'काही काळानंतर कपड्यांशिवाय'; दिपिकाच्या भगव्या बिकीनी वादात शक्तीमानची उडी

'झंडू बाम'

'झंडू बाम'

'झंडू बाम'

सलमान खानचा सुपरहिट चित्रपट दबंगही याच वादाला बळी पडला होता. दबंगचे मुन्नी हे गाणे बदनाम अभिनेत्री मलायका अरोरा हिच्यावर चित्रित करण्यात आले होते. चित्रपटाला सुपरहिट करण्यात या गाण्याने खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती, परंतु गाण्यात 'झंडू बाम' हा शब्द वापरल्याने चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर बाचाबाची झाली. हे गाणे समोर आल्यानंतर झंडू बाम बनवणाऱ्या कंपनीने त्यांच्या उत्पादनाचे नाव त्यांच्या परवानगीशिवाय वापरल्याचा दावा केला होता.

हेही वाचा: Pathaan: हिंदूंच झालं.. आता मुस्लिम भडकले.. दीपिकाच्या बिकिनीच काही खरं नाही..