या वयात मर्दांनी.. बॉईज ३ चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

boyz 3 movie trailer out release date cast vidula chaugule sumant shinde parth bhalerao pratik lad

या वयात मर्दांनी.. बॉईज ३चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित..

बॉईज सिरीजने सर्वांचच भरपूर मनोरंजन केले आहे.धैर्य, ढुंग्या आणि कबीर ह्या त्रिकूटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळालं. 'बॉईज' आणि 'बॉईज २' ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः दंगा घातल्यानंतर 'बॉईज ३' काय नवीन हंगामा घेऊन येणार याकडे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. नुकताच 'बॉईज ३'च्या संपूर्ण टीम च्या उपस्तिथीत या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले आहे. 'बॉईज ३' चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे त्रिकूट आणि विदुला करत असलेल्या प्रवासाची झलक आपल्याला पाहायला मिळाली आहे.

(boyz 3 movie trailer out release date cast vidula chaugule sumant shinde parth bhalerao pratik lad)

लुंगीतलं हे कमाल त्रिकूट दक्षिण दिशेला करत असलेल्या प्रवासाची ही गोष्ट आहे. त्यांच्या या प्रवासात आलेलं विदुला नावाचे वळण कोणत्या ठिकाणी या तिघांना घेऊन जाणार ते चित्रपट पहिल्या नंतरच कळणार. विदुलाचा कमाल अंदाज ,सुमंत शिंदे ,पार्थ भालेराव, प्रतीक लाड यांच्या उत्कृष्ट अभिनयाने रंगलेला हा चित्रपट येत्या १६ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.चित्रपटातील 'लग्नाळू २.o' गाणं प्रेक्षकांना भरपूर आवडले असून विदुलाची वेगळीच छबी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आली आहे. मैत्रीमध्ये एकमेकांना अडचणीत टाकणं असो किंवा त्याच अडचणीतून त्यांना बाहेर काढण्यासाठीची मदत असो मित्र नेहमीच हाजीर असतात. मैत्रीची व्याख्या नव्या अंदाजात ह्या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. धैर्य, ढुंग्या आणि कबीर यांच्यातील मैत्री खरंच खूप धमाल असणार आहे हे ट्रेलर पाहून वाटत आहे.

या ट्रेलर बद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, " 'बॉईज ३' चित्रपटाचा ट्रेलर पाहून या चित्रपटासाठीची प्रेक्षकांची वाढती उत्सुकता पाहून खूप भारी वाटत आहे. सर्वच 'बॉईज ३' च्या टीमने खूप मेहनत घेतलेली आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षांवर हा चित्रपट खरा उतरेल याची मला खात्री आहे."

दिग्दर्शक विशाल सखाराम देवरुखकर म्हणतात," 'बॉईज' आणि 'बॉईज २' ला मिळालेल तुफान प्रतिसाद पाहता मनोरंजनात भर म्हणून यंदा 'बॉईज ३' तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सर्वच कलाकारांनी आपापली भूमिका चोख बजावली आहे. १६ सप्टेंबर ला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सर्व प्रेक्षक वर्गाचा प्रेम आणि आशीर्वाद राहो अशी आशा आहे." सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत 'बॉईज ३' चे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या १६ सप्टेंबर रोजी ‘बॅाईज ३’ चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

Web Title: Boyz 3 Movie Trailer Out Release Date Cast Vidula Chaugule Sumant Shinde Parth Bhalerao Pratik Lad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Marathi Movies