Oscar 2020 : ब्रॅड पिट ठरला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता

वृत्तसंस्था
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

ऑस्करमधील पहिला पुरस्कार हॉलिवूडचा सुपरस्टार ब्रॅड पिट याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी मिळाला. 'वन्स अपॉन अ टाईम इन अमेरिका' या चित्रपटातील सहाय्यक व्यक्तिरेखेसाठी त्याला हा सन्मान मिळाला. 

लॉस एंजेलिस : जगातील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठीत अशा ऑस्कर पुरस्कार वितरणाचा भव्यदिव्य सोहळा आज (ता. १०) लॉस एंजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार रपडत आहे. ऑस्करचे यंदाचे ९२वे वर्ष असून दिग्गजांनी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली आहे. ऑस्करमधील पहिला पुरस्कार हॉलिवूडचा सुपरस्टार ब्रॅड पिट याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी मिळाला. 'वन्स अपॉन अ टाईम इन अमेरिका' या चित्रपटातील सहाय्यक व्यक्तिरेखेसाठी त्याला हा सन्मान मिळाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ब्रॅड पिटसह सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार लॉरा डर्न हिला मॅरेज स्टोरी या चित्रपटासाठी मिळाला. तर पॅरासाईट या बहुचर्चित चित्रपटाला बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म हा पुरस्कार मिळाला आहे. बेस्ट सिनेमॅटोग्राफीचा अॅवॉर्ड '1917' या चित्रपटाला मिळाला आहे. तर हेअर लव्ह या चित्रपटाला बेस्ट शॉर्टफिल्मचा किताब मिळाला आहे. तर बेस्ट अॅनिमेटेड मूव्ही 'टॉय स्टोरी ४' ठरला आहे.

"मदाथी ऍन अनफेअरी टेल' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा

 

ब्रॅड पिटने त्याला मिळालेला पुरस्कार हा त्याच्या मुलांना डेडिकेट केला. 'माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे.' असं सांगत त्याने हा पुरस्कार त्यांच्या नावे केला. पुरस्कार प्रदान कार्यक्रम सुरू असून महत्त्वाचे पुरस्कार अजून बाकी आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brad Pitt Best supporting actor in Oscar 2020