esakal | ब्रॅड पिटला मिळाला मुलांचा संयुक्त ताबा; अँजेलिनाचे प्रयत्न ठरले अयशस्वी
sakal

बोलून बातमी शोधा

Brad Pitt Angelina Jolie

ब्रॅड पिटला मिळाला मुलांचा संयुक्त ताबा; अँजेलिनाचे प्रयत्न ठरले अयशस्वी

sakal_logo
By
स्वाती वेमूल

गेल्या काही महिन्यांपासून झालेल्या न्यायालयीन सुनावणीनंतर अखेर अभिनेता ब्रॅड पिटला Brad Pitt त्याच्या मुलांचा पत्नी अँजेलिना जोलीसोबत Angelina Jolie संयुक्त ताबा मिळाला आहे. टीएमझेडने दिलेल्या वृत्तानुसार, न्यायाधीशांनी या प्रकरणात तात्पुरता निकाल दिला असून ब्रॅड आणि अँजेलिना यांना त्यांच्या पाच अल्पवयीन मुलांचा संयुक्त ताबा मिळाला आहे. या दोघांना पॅक्स, झहारा, शिलोह, नॉक्स आणि विविने अशी पाच मुलं आहेत. मात्र कायदेशीर बाबींमुळे त्यांच्या १९ वर्षीय मॅडॉक्स या मुलाचा निकालात समावेश करण्यात आला नाही. (Brad Pitt granted joint custody of children with Angelina Jolie)

ब्रॅडला मुलांचा संयुक्त ताबा मिळू नये यासाठी अँजेलिनाने बरेच प्रयत्न केले होते. अँजेलिनाला मुलांचा संपूर्ण ताबा हवा होता आणि यासाठी ती ब्रॅडचा कथित घरगुती हिंसाचाराचा इतिहास सिद्ध करण्यासाठी अनेक साक्षीदारांना न्यायालयासमोर आणत होती.

हेही वाचा: 'देवमाणूस'चा शेवट इतक्यात नाही; येणार मोठा ट्विस्ट

ब्रॅड आणि अँजेलिना हे हॉलिवूडमधील सर्वांत चर्चेत असलेलं कपल आहे. हे दोघं, त्यांची स्वत:ची मुलं आणि विविध देशांमधून दत्तक घेतलेली मुलं असा भलामोठा त्यांचा परिवार, कुणालाही हेवा वाटावा असा होता. मात्र २०१६ मध्ये या दोघांच्या आयुष्यात मोठं वादळ आलं आणि या जोडीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २००४ मध्ये ब्रॅड आणि अँजेलिना एकमेकांना डेट करू लागले होते. लग्नाच्या दोन वर्षांनंतर सप्टेंबर २०१६ मध्ये हे दोघं विभक्त झाले. या दोघांना सहा मुलं आहेत.