esakal | 'देवमाणूस'चा शेवट इतक्यात नाही; येणार मोठा ट्विस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Devmanus

'देवमाणूस'चा शेवट इतक्यात नाही; येणार मोठा ट्विस्ट

sakal_logo
By
स्वाती वेमूल

झी मराठी Zee Marathi वाहिनीवरील 'देवमाणूस' Devmanus ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा आहे. कथानकामुळे ही मालिका सतत चर्चेत होती. या मालिकेचा शेवट कसा होणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. मात्र ही मालिका इतक्यात तरी प्रेक्षकांचा निरोप घेणार नाही. पण मालिकेच्या कथानक अत्यंत रंजक वळण येणार हे नक्की. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ही मालिका सुरू झाली. याचं कथानक सत्य घटनेवर आधारित असल्याने मालिका विशेष चर्चेत होती. मालिकेतील बोगस डॉक्टर अजितकुमार देव याने तब्बल नऊ हत्या केल्याचं दाखवण्यात आलं आहे. (devmanus serial is not going off air soon updates about major twist in it)

या बोगस डॉक्टरविरोधात एसीपी दिव्या सिंग पुरावे गोळा करत आहे. मात्र पोलिसांना मिळालेले सर्व पुरावे अजितकुमार नष्ट करताना दिसला. त्याच्या वाटेत कोणी आलं तरी त्याला त्याने संपवून टाकलं. परंतु, आता लवकरच सत्य सर्वांसमोर येणार आहे. एसीपी दिव्या सिंगला अजितकुमारविरोधात काही पुरावे मिळाले आहेत. डॉक्टरच्या बोटांचे ठसे, चाकूचा पेन असे काही पुरावे तिने मिळवले आहेत. त्यामुळे अजितकुमारवरील तिचा संशय आणखी बळावला आहे.

हेही वाचा: 'तारक मेहता..'मधील 'गडा इलेक्ट्रॉनिक्स' झालं पर्यटनस्थळ

या पुराव्यांच्या आधारे दिव्या डॉक्टरला अटक करणार आहे. ३१ मे रोजी अजितकुमार पोलीस कोठडीत दिसणार असून डिंपल या सर्व प्रकरणाचा खुलासा करणार असल्याचं समजतंय. मालिकेत अभिनेता किरण गायकवाड मुख्य भूमिका साकारत आहे. त्याच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून फार कौतुक होतंय.