Shahrukh Khan च्या वाढदिवशी चाहत्यांना मिळालं तिसरं गिफ्ट! 'ब्रह्मास्त्र' शी संबंधित मोठी माहिती समोर

शाहरुखच्या वाढदिवसानिमित्तानं 'ब्रह्मास्त्र'चा दिग्दर्शक अयान मुखर्जीनं केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.
Brahmastra part one shiva first 10 mins free for everybody on disney hot star on shahrukh birthday.
Brahmastra part one shiva first 10 mins free for everybody on disney hot star on shahrukh birthday. Google
Updated on

Shahrukh Khan Birthday: बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान त्याचा ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवस बादशहाचा असला तरी गिफ्ट्स मात्र त्याच्या चाहत्यांना मिळत आहेत. शाहरुखच्या चाहत्यांना पहिलं गिफ्ट तेव्हा मिळालं जेव्हा अर्ध्या रात्री त्यानं मन्नतच्या बालकणीत आपला धाकटा मुलगा अबराम सोबत येऊन चाहत्यांना अभिवादन केलं.

त्यानंतर चाहत्यांना दुसरं गिफ्ट तेव्हा मिळालं जेव्हा शाहरुखच्या आगामी 'पठाण' सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला. आता चाहत्यांना तिसरं गिफ्ट देखील मिळालं आहे,जे आलिया-रणबीरच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाशी संबंधित आहे.(Brahmastra part one shiva first 10 mins free for everybody on disney hot star on shahrukh birthday.)

Brahmastra part one shiva first 10 mins free for everybody on disney hot star on shahrukh birthday.
Shahrukh Khan: बायकोइतकीच शाहरुखच्या आयुष्यात महत्वाची आहे 'ती', कोण आहे पूजा ददलानी?

ब्रह्मास्त्रचा दिग्दर्शक अयान मुखर्जीनं शाहरुख खानच्या वाढदिवशी त्याच्या चाहत्यांना एक खास गिफ्ट दिलं आहे. हे गिफ्ट नेमकं कोणतं आहे हे जाणून घेण्याआधी माहिती करुन घ्या की रणबीर-आलियाचा ब्रह्मास्त्र सिनेमा ९ सप्टेंबर,२०२२ रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. ट्रोलर्सचा विरोध आणि बॉयकॉट ट्रेन्डचा सामना करत या सिनेमानं बॉक्सऑफिसवर भरघोस कमाई केली. ब्रह्मास्त्र पार्ट १ च्या रिलीजनंतर कितीतरी दिवस ब्रह्मास्त्र पार्ट २ ची चर्चा रंगली होती.

Brahmastra part one shiva first 10 mins free for everybody on disney hot star on shahrukh birthday.
Pathan Teaser: 'पठाण' च्या टीझरमध्ये खंडीभर चूका, शाहरुखची खिल्ली उडवत लोक म्हणाले...

ब्रह्मास्त्रच्या पहिल्या भागात शाहरुखनं वानरास्त्र ही छोटीशी व्यक्तिरेखा साकारली होती. त्याची छोटीशी झलक पाहूनही त्याचे चाहते तेव्हा खूश झाले होते. २०१८ नंतर आपल्या लाडक्या अभिनेत्याला इतक्या वर्षांनी पाहताना चाहते सुखावले होते. आता हा सिनेमा ४ नोव्हेंबर २०२२ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. पण त्याआधी शाहरुखच्या वाढदिवसानिमित्तानं अयान मुखर्जीनं एक मस्त गिफ्ट दिलं आहे.

अयानने डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होणाऱ्या ब्रह्मास्त्र सिनेमाचा पहिला १० मिनिटांचा भाग फ्री दाखवण्याचा निर्णय घेतल्याचं आपल्या पोस्टमधून सांगितलं आहे. आणि या पहिल्या १० मिनिटातच शाहरुखची सिनेमातील व्यक्तिरेखा समोर येते. अयाननं पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,''डिस्ने प्लस हॉट स्टारवर आजपासून सर्वांसाठी ब्रह्मास्त्रचा पहिल्या १० मिनिटांचा भाग मोफत..''

ब्रह्मास्त्र सिनेमात देव ही व्यक्तिरेखा महत्त्वाची होती. देव कपूर हे सिनेमातील रणबीरची व्यक्तिरेखा शिव कपूरचे वडील असतात. पहिल्या भागात देव या व्यक्तिरेखेची खूप छोटी झलक पहायला मिळाली आहे,लोकांचे म्हणणे आहे की तो रणवीर सिंग आहे तर काहींचे म्हणणे पडले की हृतिक रोशन आहे. काही दिवस आधी केजीएफ स्टार यशचे देखील नाव समोर आले. पण करण जोहरने या बातम्यात काहीच तथ्य नसल्याचं म्हटलं होतं. आता हे पाहणं इंट्रेस्टिंग असेल की देव ही व्यक्तिरेखा नेमकं कोण साकारणार आहे.कारण सिनेमाच्या सीक्वेलमध्ये देव ही व्यक्तिरेखा महत्त्वाची असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com