'ब्रम्हास्त्र' ट्रेलरचं कौतुक अमृताला पडलं भारी, अभिनेत्री ट्रोलर्सच्या निशाण्यावर

‘ब्रह्मास्त्र भाग 1 शिवा’ चित्रपटाच्या ट्रेलवर अभिनेत्री अमृता खानविलकरला कमेंट करण पडलं महागात
amruta khanvilkar
amruta khanvilkaresakal
Updated on

बॉलिवूडमधील बहुचर्चित सिनेमा (Brahmastra Official Trailer) ‘ब्रह्मास्त्र भाग 1 शिवा’ चा ट्रेलर धुमधडाक्यात आज प्रदर्शित झाला. या ट्रेलरला काहीच तासात दहा लाखाहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. सर्वत्र या ट्रेलरचं कौतुक होताना दिसत आहे. अशातच, मराठी सिनेसृष्टीची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरहिनेदेखील ‘ब्रह्मास्त्र भाग 1 शिवा’ या चित्रपटाच्या ट्रेलरचे कौतुक केले. मात्र, तिच्या कमेंटमुळे ती सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे.

amruta khanvilkar
काश्मिरी पंडितांचे पलायन अन् गोरक्षकांकडून होणाऱ्या हिंसेवर बोलली साई पल्लवी

अमृता खानविलकर हे नाव सध्या मराठी नाही तर बॉलिवूडमध्ये सुद्धा गाजताना दिसत आहे. दरम्यान, ‘ब्रह्मास्त्र भाग 1 शिवा’ चा ट्रेलर पाहून चाहत्यांप्रमाणे अमृतालाही कमेंट केल्याशिवाय राहवलं नाही.

आलियाने ट्रेलरची पोस्ट शेअर करताच अमृताने त्यावर कमेंट करत, ‘ब्रह्मास्त्र’च्या ट्रेलरचं भरभरून कौतुक केलं. ‘Ooooooohhhhhhhhhhh goooddddddd spectacular mind blowing out of this world’ असं कमेंट करताना अमृताने लिहिलं. झालं...!!

Sakal

अमृताची ही कमेंट पाहून युजर्स भलतेच भडकले आहेत. ‘इतकं पण ओव्हर रिअ‍ॅक्ट करू नकोस. इतका पण काही छान नाहीये, तुला सुद्धा हे माहित आहे,’असे एका युजरने तिची कमेंट पाहून म्हटलं आहे.

amruta khanvilkar
सिद्धार्थ जाधवचं वैवाहिक आयुष्य अडचणीत? 'त्या' इन्स्टा पोस्टने चर्चेला उधाण

तर दुसऱ्या बाजुला, 'या चित्रपटाचा ट्रेलर खरंच चांगला आहे.हॉलीवूडच्या चित्रपटांना जसे आपण प्रोत्साहन देतो तसे बॉलीवूडच्या चित्रपटांना ही द्यायला हवं.' अशा शब्दात नेटकऱ्यांनी अमृताची बाजू घेतली आहे.

‘राझी’ या चित्रपटात अमृता खानविलकरने आलिया भटसोबत काम केलंय. आलियाची ती फॅन आहे. आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमाचंही अमृताने असंच कौतुक केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com