Bramhastra : दुसऱ्या-तिसऱ्या पार्टबाबत रणबीरचं मोठं 'सिक्रेट', 'आता...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bramhastra Movie news

Bramhastra : दुसऱ्या-तिसऱ्या पार्टबाबत रणबीरचं मोठं 'सिक्रेट', 'आता...'

Bramhastra Movie News: भलेही ब्रम्हास्त्रला अनेकांनी ट्रोल केले असेल त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली असेल मात्र या चित्रपटानं आपलं (Ranbir Kapoor) नाणं किती खरं आहे हे प्रेक्षकांना दाखवून दिलं आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटानं आतापर्यत दोनशे कोटींची कमाई केल्याचे आकडे समोर आले आहे. केवळ भारतातच नाहीतर परदेशात देखील ब्रम्हास्त्रनं आपली (viral News) घौडदौड सुरुच ठेवली आहे. रणबीर- आलियाच्या हटके स्टोरीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. भल्या भल्या समीक्षकांनी ब्रम्हास्त्रवर टीका केली असताना यात दिग्दर्शकानं एक मोठी घोषणा केलीय.

चालु वर्षी सर्वाधिक चर्चेत असलेली फिल्म म्हणून ब्रम्हास्त्रचे नाव घेता येईल. या चित्रपटानं दोन आठवड्यांमध्ये दोनशे कोटींचा टप्पा गाठला आहे. अजुन एक ते दोन आठवडे हा चित्रपट थिएटरमध्ये सुरु राहण्याची शक्यता आहे. शाहरुख खान, अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय यासारख्या कलाकारांची मोठी फौज ब्रम्हास्त्रमध्ये दिसून आली. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला. सुरुवातीला अनेकांच्या रडारवर असणाऱ्या ब्रम्हास्त्रनं मोठी कमाई केली आहे.

ब्रम्हास्त्रचा पहिला भाग शिवा या नावानं प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याला प्रचंड यशही मिळालं आहे. आणखी दोन भाग अजुन प्रदर्शित व्हायचे आहे. त्याच्याविषयी अयान मुखर्जी यांनी मोठं भाष्य़ केलं आहे. येत्या काळात वेगानं दुसऱ्या आणि तिसऱ्या भागाचे चित्रिकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही भागांचे चित्रिकरण हे एकाचवेळी सुरु राहणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही. असे म्हटले जात आहे.

ब्रम्हास्त्रमध्ये मुख्य नायकाची भूमिका साकारलेल्या रणवीरनं इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये काही गोष्टींबाबत खुलासा केला आहे. त्यात तो म्हणतो की, आमची पूर्ण टीम पुढील भागासाठी कमालीची उत्सुक आहे. वेगवेगळ्या अस्त्रांवर आधारित या चित्रपटांच्या उर्वरीत भागांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळेच दुसऱ्या आणि तिसऱ्या भागाचे चित्रिकरण हे एकत्रित होणार असल्याचे त्यानं सांगितलं आहे.

Web Title: Bramhastra Movie Ranbir Kapoor Interview Share Next Two Part Secrets Viral Details

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..