Bramhastra: रणबीरचा 400 कोटींचा 'ब्रम्हास्त्र' आपटणार की गाजणार?

रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ब्रम्हास्त्रची प्रेक्षक गेल्या तीन वर्षांपासून वाट पाहत आहेत. आलिया - रणबीर हे पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र दिसणार आहेत.
Brahmastra Movie News
Brahmastra Movie Newsesakal
Updated on

Brahmastra Day 1 Box Office Collection - रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ब्रम्हास्त्रची प्रेक्षक गेल्या तीन वर्षांपासून वाट पाहत आहेत. आलिया - रणबीर हे पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र दिसणार आहेत. बॉयकॉट बॉलीवूड असा ट्रेंड जोरदारपणे सुरु असताना दुसरीकडे रणबीरच्या ब्रम्हास्त्रचे (Ranbir kapoor) काय होणार असा प्रश्न निर्माते आणि दिग्दर्शकांना पडला आहे. एकीकडे बॉलीवूडमधल्या भल्या भल्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना प्रेक्षकांनी धडा (Alia Bhatt) शिकवल्यानं रणबीरच्या ब्रम्हास्त्रवर सगळ्यांची नजर असल्याचे सांगितले जात आहे.

बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा वादही रंगलेला आहे. त्यावरुन दिग्गज सेलिब्रेटींनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. प्रेक्षकांना जे आवडते त्यावर ते कौतूकाचा वर्षाव करतात त्यामुळे टॉलीवूडनं बॉलीवूडला धक्का दिला असे म्हणणे चुकीचे असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. 9 सप्टेंबरला ब्रम्हास्त्र प्रदर्शित होणार आहे. त्याचे प्रमोशनही जोरदारपणे सुरु असल्याचे दिसून आले आहे. दोनशे कोटींपेक्षा अधिक बजेट असलेल्या या चित्रपटाची निर्मिती करण जोहरनं केली आहे. त्याच्या गेल्या काही चित्रपटांचा आढावा घेता ते बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्याचे दिसून आले आहे.

दिग्दर्शक अयान मुखर्जीनं या चित्रपटासाठी तब्बल दहा वर्षे मेहनत घेतली आहे. त्यामुळे त्याचा तो ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर अजुनही बॉयकॉट बॉलीवूड असा ट्रेंड सुरु असल्यानं निर्मात्यांची धाकधुक वाढली आहे. आमिरच्या लाल सिंग चढ्ढाला बसलेला मोठा धक्का अनेकांसाठी धोक्याची घंटा होती अशी चर्चा आहे. काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील बॉलीवूडच्या दिग्दर्शकांसाठी ही प्रेक्षकांकडून आलेली महत्वाची चेतावणी आहे. असे म्हटले होते.

Brahmastra Movie News
Alia Bhatt: रणबीर क्वीन आलियाचा रईसी थाट! आलिशान बंगला आणि बरंच काही, बघून थक्क व्हाल

410 कोटींचे बजेट असणारा ब्रम्हास्त्र हा दोनशे कोटींपेक्षा अधिक कमाई करेल असा अंदाज चित्रपट विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. त्यातील व्हिएफएक्स हे कमालीचे लक्षवेधी असून पहिल्यांदाच बॉलीवूडमध्ये अशाप्रकारचे व्हिएफएक्स वापरण्यात आल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे. अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.

Brahmastra Movie News
Alia Bhatt: रणबीर क्वीन आलियाचा रईसी थाट! आलिशान बंगला आणि बरंच काही, बघून थक्क व्हाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com