
BTS Hiatus: बीटीएसचा मोठा निर्णय! ब्रेक घेण्याचा विचार
BTS : जगभरात सध्या एका बँडची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. ती म्हणजे बीटीएस. या पॉप बँडनं साऱ्या जगाला वेडं केलं आहे. काही वर्षांपासून सोशल मीडियावर या (Social media news) बँडनं नेटकऱ्यांना आपल्या गायकीनं चकित करुन टाकलं आहे. केवळ गायकीच नाही तर डान्स आणि अभिनय याच्या जोरावर देखील (BTS Band) चाहत्यांमध्ये सध्याच्या घडीला सर्वाधिक लोकप्रिय काय असा प्रश्न जर विचारला तर त्याचे उत्तर बीटीएसचे नाव घेता येईल. विशेषत तरुणाईमध्ये या बँडची मोठी क्रेझ आहे. बीटीएसनं आता एक मोठा निर्णय घेतला आहे. तो काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
साऊथ कोरियाच्या प्रसिद्ध पॉप बँड असणाऱ्या बीटीएसनं काही काळ ब्रेक घेण्याचा विचार केला आहे. त्यांनी ब्रेक घेणं हे त्यांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील )(South Korea BTS) परिणाम करणारं आहे. अशी चर्चा आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहे. याशिवाय साऊथ कोरियातील वेगवेगळ्या मोठ्या कंपन्यांना देखील मोठे नुकसान होणार आहे. 14 जुन रोजी बीटीएसनं एक मोठा निर्णय जाहिर केला. तो म्हणजे त्यांनी आपण काही काळ ब्रेक घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या जगभरातील असंख्य चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बीटीएसचे जेवढे सदस्य आहेत ते आता सगळे आपआपल्या करिअरवर लक्ष देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या लोकप्रिय बँडनं आतापर्यत 32 मिलियनपेक्षा अधिक त्यांचे अल्बम विकले आहेत. सात लोकांच्या त्या ग्रुपनं साऱ्या जगाला वेड लावलं आहे. बीटीएसनं त्यांच्या फेस्टा डिनर दरम्यान ही घोषणा केली आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्या घोषणेमध्ये त्यांनी आगामी दिवसांत काय करायचे आहे याची मोठी यादी तयार केली आहे. बीटीएसमध्ये आरएम, जिन, सुगा, जे होप, जिमिन, वी आणि जुंगकुक यांचा समावेश आहे. एक तासांच्या त्या फेस्टमध्ये या सदस्यांनी आपल्या प्रोजेक्टसवर फोकस करणार असल्याचे सांगत काही दिवस ब्रेक घेणार असल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा: IIFA 2022: गाढवावर बसून आयफा शो मध्ये दोन बॉलीवूड सेलिब्रेटींची हजेरी
आरएमनं सांगितलं की, भलेही आम्ही एक मोठा ब्रँड म्हणून साऱ्या जगभर लोकप्रियता मिळवली असेल मात्र त्याची वेगळी ओळख तयार करण्यासाठी खूप मेहनत देखील घेतली आहे. आम्हाला आणखी चांगल्या पद्धतीनं सादरीकरण करण्यासाठी काही गोष्टी शिकण्याची गरज आहे. त्यामुळे थोड्या दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा प्रेक्षकांसमोर येण्याचा निर्णय या ग्रुपनं घेतला आहे. 2013 मध्ये बीटीएसच्या ग्रुपनं परफॉर्मन्सला सुरुवात केली होती.
हेही वाचा: kamal haasan debt: 'विक्रम'च्या कमाईतून कमल हासन करणार आणखी एक 'विक्रम'
Web Title: Bts Big Announcement Take Break To Focus Projects Reason Viral
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..