esakal | Cannes Film Festival 2021; 'टायटन' ठरला 'सर्वोत्कृष्ठ' चित्रपट
sakal

बोलून बातमी शोधा

titan film

Cannes Film Festival 2021; 'टायटन' ठरला 'सर्वोत्कृष्ठ' चित्रपट

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - जगभरातल्या चित्रपट रसिकांसाठी आनंदाची पर्वणी असणारा चित्रपट महोत्सव म्हणून कान्सकडे (cannes film festival) पाहिले जाते. यंदाच्या कान्सच्या महोत्वसवालाही देखील प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्या. गेल्या वर्षी जगभरातील अनेक महत्वाच्या चित्रपट महोत्सवांवर कोरोनाचे सावट होते. अशावेळी कलाकारांसह प्रेक्षकांचीही निराशा झाली होती. यावर्षीच्या 74 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये काही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात टायटन या चित्रपटावर कौतूकाची मोहोर उमटली आहे. (cannes film festival 2021 titan wins best film award winners yst88)

टायटनला कान्सचा यंदाचा सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. सेक्स आणि क्राईम या विषयावरील या चित्रपटानं हिंसेची एक वेगळी व्याख्या चित्रपटाच्या माध्यमातून पुढे आणली आहे. त्याला प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक यांची पसंती मिळाली आहे. आगळ्या वेगळ्या विषयावरील मांडणी तेवढ्याच ताकदीची पटकथा आणि अफलातून छायांकन या गुणांमुळे त्याच्या वाट्याला हा पुरस्कार आल्याची चर्चा आहे.

ज्युलिया डूकोरनाऊ पाल्म डी ओर ही या चित्रपटाची दिग्दर्शिका आहे. असा पुरस्कार मिळवणारी ती दुसरी महिला आहे. डूकोरनाऊची ही दुसरी फिल्म आहे. एका गुन्हेगार महिलेची कथा चित्रपटात सांगण्यात आली आहे. तिच्या लहानपणी तिला मोठ्या गुन्हयाला सामोरं जावं लागतं. लहानपणी तिचा मोठा अपघात होतो. त्याच्या आठवणी तिच्या मनात कायम आहेत. तेव्हापासून ती कारच्या प्रेमात पडते. कान्सच्या महोत्सवाचे अध्यक्ष स्पाइक ली यांनी पुरस्काराची घोषणा केली.

हेही वाचा: 'आर्थिक संकटात होतो तेव्हा...' ; राजपाल यादवने सांगितल्या आठवणी

सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार कालेब लँड्री जोन्सला मिळाला आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार नॉर्वेच्या रेनेट रिन्सवेला मिळाला आहे. बेस्ट डॉक्युमेंटरीचा पुरस्कार ओइल डि ओरला मिळाला आहे. 2020 चा पुरस्कार सोहळा का कोरोनामुळे रद्द करण्यात आला होता.

loading image