'कॅप्टन अमेरिकेला' फाईट देण्यासाठी येतोय 'कॅप्टन इंडिया'

प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (kartik aryan) आणि हंसल मेहता (hansal mehta) एक मोठा धमाका करण्यास तयार झाले आहे.
captain india
captain india team esakal

मुंबई - प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (kartik aryan) आणि हंसल मेहता (hansal mehta) एक मोठा धमाका करण्यास तयार झाले आहे. मेहता यांचा कॅप्टन इंडिया नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते हंसल मेहता करणार आहे. तर निर्मिती रॉनी स्क्रुवाला यांचे असणार आहे. अॅक्शन ड्रामा म्हणून या प्रकारातील हा चित्रपट असणार आहे. त्यात कार्तिकनं एका पायलटची भूमिका साकारली आहे. नेहमीपेक्षा एका वेगळ्या अंदाजात कार्तिक या चित्रपटामध्ये झळकणार आहे. (captain india new movie of kartik aaryan with hansal mehta yst88)

चित्रपटाचे दिग्दर्शक हंसल मेहता यांनी सांगितले की, हा चित्रपट खऱ्या घटनांवर आधारित आहे. त्यात असे प्रसंग दर्शविण्यात आले आहे ज्यांची तुलना आपण आपल्या आयुष्यातील दैनंदिन प्रसंगाशी करु शकतो. जो सर्वसामान्य लोकांशी लढतो आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. चित्रपटात प्रेक्षकांना अमानवीय काय वाटणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

निर्माता रॉनी स्क्रुवाला यांनी सांगितलं की, कॅप्टन इंडिया हा केवळ वेगळ्या प्रकारच्या गोष्टी करत नाही तर तो सर्वसामान्य माणसाला बळ देतो. आपल्याकडून काही अविश्वसनीय गोष्टी घडतात आणि त्यावर आपण सहजासहजी विश्वास ठेवायला तयार नसतो असे काहीसे घडते. कॅप्टन अमेरिकेतून यात वेगळ्या पद्धतीने भाष्य करण्यात आले होते. सततच्या संकटांना तोंड देऊन त्याविरोधात उभं राहण्याची ताकद कॅप्टन इंडियामध्ये आहे. आपण आपल्याकडच्या चित्रपटांचे स्वागत केले पाहिजे. या चित्रपटामध्ये कॅप्टन इंडियाच्या भूमिकेत कार्तिक आर्यन दिसणार आहे.

captain india
नवऱ्यानंतर बायकोही अडचणीत, शिल्पा शेट्टीच्या घरी क्राईम ब्रँचचा छापा
captain india
'शाहरूखची हिरोईन करतो', असं सांगून युवतींची तस्करी करणारा गजाआड

लेखक आणि निर्माता हरमन बावेजा म्हणतात, कॅप्टन इंडिया हा असा चित्रपट आहे ज्यात एक प्रेरणादायी मानवी कथा सांगण्यात आली आहे. त्यातून एक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला खात्री आहे की, हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करेल. कॅप्टन अमेरिका हा जगभरात गाजलेला चित्रपट होता. मात्र कॅप्टन इंडिया देखील त्याच्या तोडीस तोड असणार आहे. असा विश्वासही बावेजा यांनी यावेळी व्यक्त केला. पुढील वर्षी या चित्रपटाची शुटिंग सुरु होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com