esakal | बलात्कार प्रकरण: अक्षय, सलमानसह ३८ सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

ajay salman akshay

बलात्कार प्रकरण: अक्षय, सलमानसह ३८ सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
स्वाती वेमूल

देशाला सुन्न करणाऱ्या हैदराबाद सामूहिक बलात्कार Hyderabad Rape Case घटनेनंतर सर्वच स्तरांतून संतापाची लाट उसळली होती. २०१९ मध्ये पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करत न्यायाची मागणी केली होती. यामध्ये अनेक नामांकित बॉलिवूड आणि टॉलिवूड कलाकारांचा समावेश होता. मात्र घटनेबद्दल व्यक्त होताना पीडितेचं खरं नाव उघड केल्याने ३८ सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अक्षय कुमार Akshay Kumar, सलमान खान Salman Khan, अजय देवगण Ajay Devgn, रकुलप्रीत सिंग यांच्यासह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा समावेश आहे. बलात्कार पीडित मुलीची ओळख उघड करणं हा कायद्याने गुन्हा आहे. कायद्यानुसार कोणत्याही बलात्कार पीडितेचं नाव, फोटो किंवा खरी ओळख उघड करणं हा गुन्हा आहे. दिल्लीतील वकिल गौरव गुलाटी यांनी पीडितेचं नाव उघड करणाऱ्या सेलिब्रिटींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बलात्कार पीडितेचं खरं नाव उघड केल्याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 228A अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा दाखल केलेल्या या ३८ सेलिब्रिटींवर काय कारवाई केली जाईल, याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे. "सर्वसामान्यांसमोर आदर्श उदाहरण सादर करण्याऐवजी हे सेलिब्रिटी उलट नियम मोडत आहेत. संबंधित सेलिब्रिटींना अटक करण्यात यावी", अशी मागणी तक्रारकर्त्याने केली आहे.

इतर सेलिब्रिटींची नावं

अनुपम खेर, फरहान अख्तर, रवी तेजा, अल्लु सीरिश, चार्मी कौर यांच्याविरोधातही गुन्हा दाखल

हेही वाचा: अभिनेत्री आसावरी जोशीचा अपघात? जाणून घ्या सत्य..

बलात्कार करून पशुवैद्यक तरुणीची हत्या करणाऱ्या चारही आरोपींना कथित पोलीस चकमकीत ठार करण्यात आले होते. चकमकीच्या वृत्तानंतर नागरिकांनी तेलंगण पोलिसांचा जयजयकार केला. चकमकीचे तीव्र पडसाद संसदेच्या अधिवेशनातही उमटले होते.

loading image
go to top