esakal | अभिनेत्री आसावरी जोशीचा अपघात? जाणून घ्या सत्य..
sakal

बोलून बातमी शोधा

Asawari Joshi

अभिनेत्री आसावरी जोशीचा अपघात? जाणून घ्या सत्य..

sakal_logo
By
स्वाती वेमूल

मराठी अभिनेत्री आसावरी जोशी Asawari Joshi यांचा मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. काही माध्यमांमध्येही अपघाताचं वृत्त देताना अभिनेत्री आसावरी यांचा उल्लेख करण्यात आला. या चर्चांवर आता खुद्द आसावरी यांनीच सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं आहे. मी घरीच सुखरुप आहे, असं त्यांनी या व्हिडीओमध्ये चाहत्यांना सांगितलं.

काय म्हणाल्या आसावरी जोशी?

'6 सप्टेंबर 2021, सकाळपासून काही वृत्तवाहिन्यांवर मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर माझा अपघात झाला आहे आणि त्यात मी गंभीर जखमी झाले आहे अशी बातमी येत होती. तमाम महाराष्टातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या माझ्या चाहत्यावर्गाला, माझ्या मित्रपरीवाला आणि नातेवाईकांना मी सांगू इच्छिते की मी स्वामींच्या कृपेने आज घरीच सुखरूप आहे, काळजी नसावी. प्रसार माध्यमांच्या निष्काळजीपणामुळे आपल्या सगळ्यांनाच जो मनःस्ताप सोसावा लागला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते,' असं त्या म्हणाल्या. त्याचप्रमाणे अपघातात आसावरी जोशी नाव असलेल्या ज्या व्यक्तीला दुखापत झाली असेल, त्या लवकरच बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना त्यांनी केली.

हेही वाचा: 'मला एकट्यात लांब कुठेतरी दफन करा'; सिद्धार्थच्या अंत्यविधीनंतर करण पटेलची पोस्ट

आसावरी यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 'ऑफिस ऑफिस' या हिंदी मालिकेतील त्यांची भूमिका चांगलीच गाजली होती. 'ओम शांती ओम' या हिंदी चित्रपटात त्यांनी लव्हली कपूरची भूमिका साकारली होती. 'स्वाभिवान: शोध अस्तित्वाचा' या मालिकेत त्यांनी प्रोफेसर अदिती सूर्यवंशीची भूमिका साकारली.

loading image
go to top