esakal | सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकता आणि भन्साळींविरोधात तक्रार दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

salman karan

बॉलीवूडमध्ये घराणेशाहीचा विषय पुन्हा एकदा समोर आला आहे आणि म्हणूनंच या इंडस्ट्रीमधील काही मोठ्या हस्तींविरोधात बिहार कोर्टामध्ये तक्रार देखील केली गेली आहे. 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकता आणि भन्साळींविरोधात तक्रार दाखल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे बॉलीवूड आणि त्याच्या चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे. सुशांतच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप कळू शकलं नसलं तरी अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. त्याच्या आत्महत्येचं गुढ दिवसेंदिवस वाढतंच चाललं आहे. यासगळ्यात बॉलीवूडमध्ये घराणेशाहीचा विषय पुन्हा एकदा समोर आला आहे आणि म्हणूनंच या इंडस्ट्रीमधील काही मोठ्या हस्तींविरोधात बिहार कोर्टामध्ये तक्रार देखील केली गेली आहे. 

हे ही वाचा: दिग्दर्शक अभिनव कश्यपच्या आरोपांवर सलीम खान यांनी सोडलं मौन

मिळालेल्या माहितीनुसार, बॉलीवूड सेलिब्रिटींमध्ये सलमान खान, करण जोहर, संजय लीला भन्साळी आणि एकता कपूर यांचा नावांचा समावेश आहे. सुधीर कुमार ओझा या वकिलांनी मुजफ्फरपूर कोर्टामध्ये भारतीय दंड विधानच्या  कलम ३०६, १०९, ५०४, आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं कळतंय. 

याविषयी माध्यमांना माहिती देताना सुधीर कुमार ओझा म्हणाले, 'माझ्या तक्रारीमध्ये असं म्हटलं गेलंय की, सुशांत सिंह राजपूतला जवळपास ७ सिनेमांमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता आणि त्याचे काही सिनेमे रिलीज देखील झाले नाहीत. अशी परिस्थीती निर्माण केल्याने त्याला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं.'

याआधी काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी देखीस असाच दावा केला होता की सुशांतला ७ सिनेमांमधून काढून टाकण्यात आलं होतं. त्यांनी असा दावा देखील केला होता की गेल्या ६ महिन्यातच त्याच्या हातून ७ सिनेमे काढून घेण्यात आले. संजय निरुपम यांच्या व्यतिरिक्त बिहारचे बीजेपीचे खासदार निशिकांत दुबे, बीजेपी आमदार आणि सुशांतचे चुलत भाऊ नीरज कुमार सिंह बबलू यांनी देखील सुशांतची आत्महत्या एक कट असल्याचा संशय व्यक्त करत अधिक तपास करण्याची मागणी केली होती. 

वेगवेगळ्या सिनेमांच्या निर्मितीची जबाबदारी करण जोहर, संजय लीला भन्साळी, सलमान खान आणि एकता कपूर यांच्याकडे असल्याचं कळतंय.  

case filed against salman khan karan johar in bihar court in sushant singh rajput suicide