esakal | दिग्दर्शक अभिनव कश्यपच्या आरोपांवर सलीम खान यांनी सोडलं मौन
sakal

बोलून बातमी शोधा

salim khan on abhinav

एका फेसबुक पोस्टमध्ये 'दबंग'च्या या दिग्दर्शकाने सलीम खान यांचं नाव त्याच्या दुश्मनांच्या यादीत समाविष्ट केलं आहे. यानंतर अनेकजण खान कुटुंबाकडून यावर प्रतिक्रिया येण्याची वाट पाहत होते. 

दिग्दर्शक अभिनव कश्यपच्या आरोपांवर सलीम खान यांनी सोडलं मौन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई- सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा प्रकाश झोतात आला आहे. याच दरम्यान दिग्दर्शक अभिनव सिंह कश्यप यांनी सलमान खानवर करिअर उध्वस्त केल्याचा आरोप लावला होता. अभिनव यांनी खुलासा केला होता की सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांचं करिअर उध्वस्त केलं आहे आणि त्यांना इंडस्ट्रीतून बाहेर काढण्याचा देखील प्रयत्न केला आहे. एका फेसबुक पोस्टमध्ये 'दबंग'च्या या दिग्दर्शकाने सलीम खान यांचं नाव त्याच्या दुश्मनांच्या यादीत समाविष्ट केलं आहे. यानंतर अनेकजण खान कुटुंबाकडून यावर प्रतिक्रिया येण्याची वाट पाहत होते. 

हे ही वाचा: सुशांतच्या घरातून पोलिसांनी कागदपत्र आणि लॅपटॉप केला जप्त

प्रसिद्ध पटकथालेखक आणि सलमान खानचे वडिल सलीम खान यांनी अभिनव सिंह कश्यप यांनी केलेल्या आरोपांवर आता प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, त्याने जे काही म्हटलंय त्यावर प्रतिक्रिया देणं म्हणजे वेळ वाया घालावण्यासारखं आहे. सलीम खान यांनी प्रसिद्ध वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय, 'होय आम्हीच सगळं खराब केलंय ना, तुम्ही पहिले जाऊन त्यांचे सिनेमे पाहा मग आपण यावर बातचीत करु.'

इतकंच बोलून सलीम खान थांबले नाहीत तर पुढे असंही म्हणाले की, 'त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये माझं नाव टाकलं आहे ना. त्यांना कदाचित माझ्या वडिलांच नाव माहित नाहीये. त्यांचं नाव आहे रशिद खान. त्यांना त्यात आमच्या आजोबा आणि पणजोबांचं नाव देखील टाकू दे. त्यांना जे करायचंय ते त्यांना करु देत. त्यांनी जे काही म्हटलंय त्यावर प्रतिक्रिया देऊन मी माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही. '

अभिनव यांनी खान कुटुंबावर मानसिकरित्या छळ केल्याचा आणि  इंडस्ट्रीमध्ये काम न करु देण्याचा गंभीर आरोप केला आहे. त्याचं म्हणणं आहे की खान कुटुंब त्याच्या नावाचा आणि प्रतिष्ठेचा उपयोग करत त्यांना टारगेट करत आहेत.  

salim khan reacts on abhinav singh kashyap blame post salman and arbaaz

loading image