esakal | निष्पक्ष तपासासाठी नव्या मेडिकल बोर्डाची करावी स्थापना
sakal

बोलून बातमी शोधा

Sushant singh rajput sucide case turns very diffrently.jpg

मानशिंदे यांनी राजपुत परिवाराचे वकिल असणा-या विकास सिंह यांनी शुक्रवारी केलेल्या टविटवर मानशिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुशांतच्या मृत्युला हत्येत बदलण्यासाठी सीबीआय कडुन उशीर होत आहे. यामुळे निराशा वाटते. एम्स मधल्या एका डाँक्टरने मला सांगितले की , सुशांतचा मृत्यु हा गळा दाबल्याने झाला आहे. तो आत्महत्येने झाला नाही. असे  मी पाठवलेल्या फोटोंवरुन असे दिसुन येते. गुरुवारी झालेल्या एका पञकार परिषदेत अभिनेता सुशांतसिंग याच्या प्रकरणाच्या तपासाची गाडी रुळावरुन घसरल्याची टीका केली.

निष्पक्ष तपासासाठी नव्या मेडिकल बोर्डाची करावी स्थापना

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई -  अभिनेता सुशांतसिंग याच्या आत्महत्येच्या प्रकरणात सतत नवनवीन घडामोडी होत आहेत. अनेक कलावंत, निर्माते, दिग्दर्शक यांची नावे उघडकीस आल्याने बाँलीवुडमध्ये उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सुशांत आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी असणा-या रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी तपासयंञणांचा मनमानीपणा वाढत असल्याचे म्हटले आहे. 

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी नव्या मेडिकल बोर्डाची स्थापना करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आगामी काळात बिहार येथे होणा-या निवडणुकांच्या पाश्र्वभुमीवर तातडीने या प्रकरणाचा तपास पुर्ण करायचा यासाठी  दबाव आणला जात आहे. यासगळ्या तपासाचा व्यवस्थित तपास व्हावा म्हणुन सीबीआईने एम्सच्या डाँक्टरांचे एक वेगळे पँनल तयार करावे. केवळ एका फोटोच्या आधारावर कुठला वेगळा नित्कर्ष काढणे चुकीचे आहे. 

'स्लिम दिसण्यासाठी अभिनेत्री घेतात ड्रग्स, मलाही हाच सल्ला दिला होता' राखी सावंत बरळली

सध्या सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास अनेक बाजुंनी पुढे सरकत आहे. देशातील सर्वात खळबळजनक आणि लक्षवेधी घटना म्हणुन याकडे पाहिले जात आहे. मानशिंदे म्हणाले, सुशांतसिंग राजपुत याच्या आत्महत्या प्रकरणावर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) च्या डाँक्टरांकडुन २०० टक्क्यांच्या नित्कर्षांचा उल्लेख आणि तो केवळ छायाचिञांच्या  आधारावर हे धोकादायक म्हणावे लागेल. यामुळेच पुढिल काळात तपासात इतर कुणाचा हस्तक्षेप होऊ नये यासाठी एका नव्या मेडिकल बोर्डाची निर्मिती करण्यात यावी.  बिहार मध्ये असणा-या निवडणुकांमुळे सरकारी तपासयंञणांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. बिहारचे पोलीस महानिरीक्षक गुप्तेश्वर पांडे यांची स्वेच्छानिवृत्ती समोर असल्याने परिस्थितीवर भाष्य करण्याची वेळ आली आहे. याप्रकारची कृती पुन्हा होता कामा नये.  

शाहरुखची लेक सुहानाने शेअर केली एक अजब पोस्ट, ड्रग चॅट प्रकरणावर होता सुहानाचा रोष?

 मानशिंदे यांनी राजपुत परिवाराचे वकिल असणा-या विकास सिंह यांनी शुक्रवारी केलेल्या टविटवर  प्रतिक्रिया दिली आहे. सुशांतच्या मृत्युला हत्येत बदलण्यासाठी सीबीआय कडुन उशीर होत आहे. यामुळे निराशा वाटते. एम्स मधल्या एका डाँक्टरने मला सांगितले की , सुशांतचा मृत्यु हा गळा दाबल्याने झाला आहे. तो आत्महत्येने झाला नाही. असे  मी पाठवलेल्या फोटोंवरुन असे दिसुन येते. गुरुवारी झालेल्या एका पञकार परिषदेत अभिनेता सुशांतसिंग याच्या प्रकरणाच्या तपासाची गाडी रुळावरुन घसरल्याची टीका केली. तसेच त्यांनी असेही म्हटले की, राजपुत परिवाराला असे वाटते , तपास योग्य दिशेने होत नाही. एनसीबीचा तपास हा मुंबई पोलिसांसारखा झाला आहे.  आणि म्हणुनच आता सगळ्या कलाकारांना चौकशीसाठी बोलविण्यात येत आहे. त्यातही ज्यांना बोलविण्यात आले आहे त्य़ांची केली जाणारी चौकशी म्हणजे मुंबई पोलिसांच्या तपासासारखे आहे.