सेलिब्रेटी बाप्पा! सरकारने घालून दिलेले नियम, तुमच्या-आमच्या सुरक्षेसाठीच - गौरी नलावडे

संतोष भिंगार्डे
Wednesday, 19 August 2020

अभिनेत्री गौरी नलावडे कुटुंबीयांसोबत सात दिवसांचा गणेशोत्सव साजरा करते. यंदाही नियमांच्या चौकटीत राहूनच ती नवी मुंबईतील घरात उत्सवाचा आनंद घेणार आहे... 

अभिनेत्री गौरी नलावडे कुटुंबीयांसोबत सात दिवसांचा गणेशोत्सव साजरा करते. यंदाही नियमांच्या चौकटीत राहूनच ती नवी मुंबईतील घरात उत्सवाचा आनंद घेणार आहे... 

--------------------

सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे सगळ्याच सणांवर संक्रांत आली आहे. दहीहंडी, गणेशोत्सव आणि पुढे येणारा नवरात्रोत्सव हे सगळेच सण अगदी साध्या पद्धतीने साजरे करावे लागणार आहेत. घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सरकारने काही नियम घालून दिले आहेत आणि ते योग्यच आहे. तुमच्या-आमच्या सुरक्षेसाठीच आहेत ते. आम्ही सरकारचे सर्वच निर्बंध पाळून यंदाचा गणेशोत्सव साजरा करणार आहोत. 

सेलिब्रेटी बाप्पा! यंदा आरोग्य उत्सव  साजरा करू - स्वप्नील जोशी 

माझा दादा दरवर्षी गणपती बाप्पाची मूर्ती नवी मुंबईतून आणतो. या वर्षीही आम्ही तेथूनच मूर्ती आणणार आहोत. आमच्या घरी गौरी-गणपतीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आमची नातेवाईक मंडळी येतात आणि एकच धमाल असते आमच्या घरी. गणेशोत्सवाचे ते दिवस उत्सवी आणि उत्साहाने भारलेले असतात. नातेवाईक-मित्रमंडळींचे आदरातिथ्य, पूजा-अर्चा, आरती वगैरे करण्यात ते दिवस कधी निघून जातात हे आमचे आम्हालाच कळत नाही. पण यंदाचे चित्र काहीसे निराळे आहे. आम्ही गणपतीची मूर्ती आणि गौरी आणणार आहोतच, पण साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणार आहोत. दादा-वहिनी आणि आईच्या उपस्थितीत उत्सव साजरा होईल, पण दरवर्षी जमणारी नातेवाईक मंडळी या वर्षी नसतील. ती मजाही नसेल... परंतु शेवटी सरकारी नियम पाळणे आवश्‍यक आहेच. कारण आपले आरोग्य महत्त्वाचे आहे. 

सेलिब्रेटी बाप्पा! यंदा मूर्ती छोटी, पण उत्साह मोठा - विद्या माळवदे

यंदा विसर्जन मिरवणूक नाही 
आम्ही मिरवणूक वगैरे काढून मूर्ती विसर्जन यंदा करणार नाही. दोन किंवा फार फार तर तीन जणांच्या उपस्थितीच विसर्जन होईल. नवी मुंबईतील कृत्रिम तलावातच विसर्जन केले जाईल. तेही सुरक्षित अंतर पाळूनच. तुम्ही नियमांचे पालन करा आणि यंदाच्या उत्सवाचा आनंद घ्या. 

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrity Bappa! Rules imposed by the government, only for your and our safety - Gauri Nalawade