बोल्ड भूमिका नाही : अमृता राव

शब्दांकन : चिन्मयी खरे
मंगळवार, 12 मार्च 2019

सेलिब्रिटी टॉक : अमृता राव, अभिनेत्री 

मी गेल्या चार वर्षांत इंडस्ट्रीला स्पष्ट हिंट दिली होती, की मी ब्रेकवर आहे. मी कोणत्याही पार्टी किंवा सन्मान सोहळ्यांना हजेरी लावत नव्हते. मी कोणत्याही कास्टिंग डायरेक्‍टर किंवा कोणते प्रोजेक्‍ट्‌स चालू आहेत याची माहिती मिळवत नव्हते. मात्र, "ठाकरे' चित्रपटापासून मला अनेक जण चित्रपटासाठी ऑफर देत आहेत. 

सेलिब्रिटी टॉक : अमृता राव, अभिनेत्री 

मी गेल्या चार वर्षांत इंडस्ट्रीला स्पष्ट हिंट दिली होती, की मी ब्रेकवर आहे. मी कोणत्याही पार्टी किंवा सन्मान सोहळ्यांना हजेरी लावत नव्हते. मी कोणत्याही कास्टिंग डायरेक्‍टर किंवा कोणते प्रोजेक्‍ट्‌स चालू आहेत याची माहिती मिळवत नव्हते. मात्र, "ठाकरे' चित्रपटापासून मला अनेक जण चित्रपटासाठी ऑफर देत आहेत. 

माझी या इंडस्ट्रीत एंट्रीच अपघाताने झाली. मी नशिबानेच इथे आले. माझी जागा आणि माझी ओळख मला इथे मिळाली. कारण बॅक टू बॅक चित्रपटांची "सिल्व्हर ज्युबिली' होणे आणि तुम्हाला एक लकी मॅस्कॉट म्हणून संबोधले जाणे ही, मोठी गोष्ट आहे. या गोष्टी आपण प्लॅन करू शकत नाही. "इश्‍क विश्‍क'पासून माझे एकामागोमाग एक अनेक चित्रपट हिट ठरले. पहिल्याच चित्रपटातून कोणताही गॉडफादर नसताना मला या इंडस्ट्रीत ओळख मिळाली. त्यामुळे मला स्ट्रगलही करावं लागलं नाही. करिअरच्या सुरवातीपासूनच ऑफर माझ्याकडे चालून आल्या आणि मी कोणता चित्रपट करायचा आणि कोणता नाही, हा विशेष अधिकार मिळत गेला.

मागच्या तीन चार वर्षांत इंडस्ट्रीचं रूप खूप बदललं आहे. कास्टिंग डायरेक्‍टरचं प्रस्थ वाढलं आहे. मी कधी कास्टिंग डायरेक्‍टरशी संपर्कात आले नव्हते. दिग्दर्शकाकडूनच मला फोन यायचे. चित्रपटांचे विषय आणि बनविण्याची पद्धत बदलली आहे. प्लॅटफॉर्मही बदलले आहेत. आता मी परत इंडस्ट्रीत आले असून, मी आधी भूमिका आधी केल्या तशाच पुन्हा करू इच्छित नाही. मला काहीतरी वेगळेच करायला आवडेल. निगेटिव्ह भूमिका किंवा थ्रिलर चित्रपटात मला काम करायला आवडेल. सध्या बोल्ड सीन्स सर्रास दाखविले जातात, पण मी एका मोठ्या प्रॉडक्‍शन हाउसची इनहाउस हिरॉईन होण्याचंही नाकारलं आहे. मला अशा प्रकारचं बोल्ड काम करायचं नाही. याचा अर्थ असा नाही, की मी प्रयोगशील नाही. मात्र, अशा बोल्ड भूमिका करूनच तुम्हाला वेगळं काही करता येतं असं नाही. तुमच्या अभिनय कौशल्यावरही तुम्हाला वेगवेगळे प्रयोग करून विविध प्रकारच्या भूमिका साकारता येतात. 

माझ्या मीनाताई ठाकरे यांच्या भूमिकेसाठी खूपच चांगला प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळाला. मुख्य म्हणजे मोठ्या कलाकारांकडूनही कौतुक झालं. बाळासाहेब ठाकरे यांचा खूप मोठा प्रवास आहे. त्यामुळं "ठाकरे' चित्रपटाचा दुसरा भागात कोणत्या काळापासून कथा दाखविणार, यावर मीनाताई ठाकरे यांचा किती रोल असेल, असेल की नाही ते अवलंबून आहे. पहिल्या भागातील माझ्या भूमिकेबद्दल मी खूप समाधानी आहे. त्यामुळे मला दुसऱ्या भागाचा भाग होणं कधीही आवडेलच. मीनाताई ठाकरे या खूप मोठ्या नेत्याच्या पत्नी होत्या, त्यामुळे त्यांची भूमिका करताना माझ्यावर काही पोलिटिकल प्रेशर वगैरे असणं अपेक्षित होतं. पण, तसं काही झालं नाही. अपेक्षांबद्दल बोललात ठाकरे कुटुंबीयांकडूनच नाही, तर सगळ्यांकडूनच अपेक्षा होत्या. पण त्या अपेक्षांना एक ओझं म्हणून मी त्याकडं पाहिले नाही. कारण मी मीनाताईंची भूमिका करताना उद्धवजींच्या आईची भूमिका करतेय असा विचार केला असता, तर ती भूमिका तितक्‍या सहजपणे करता आली नसती. एक कलाकार म्हणून ती भूमिका कशी करता येईल यावरच तुमचं लक्ष केंद्रित केलेलं असलं पाहिजे. मी संपूर्ण चित्रपटभर हेच केलं. मी मीनाताई ठाकरे म्हणून कशी दिसेन, यावरच माझं पूर्ण लक्ष होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrity talk with Amrita Rao in Maitrin supplement of Sakal Pune Today