Celina Jaitley : 'तू तर बाप-लेकासोबतच...' अभिनेत्री सेलिनाचा भडका!

आता तिच्यावर नेटकऱ्यांनी खालच्या पातळीवर केलेले आरोप अभिनेत्रीला सहन झालेले नाहीत.
Celina Jaitley Controversy Fardeen Khan Father Feroz
Celina Jaitley Controversy Fardeen Khan Father Feroz esakal

Celina Jaitley Controversy Fardeen Khan Father : बॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रेटी सेलिना जेटली ही एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नेटकऱ्यांनी तिच्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन आरोप केल्यानं सेलिनाचा चांगलाच भडका उडाला आहे.तिनं तिच्यावर टीका करणाऱ्यांना जशास तसे उत्तरही दिले आहे. असं काय झालं की सेलिनाला एवढा राग आला?

भलेही सेलिनाच्या वाट्याला मोजक्याच भूमिका आल्या असल्या तरी तिनं काम केलेल्या चित्रपटांना मोठा प्रेक्षकवर्ग मिळाला आहे. सेलिना ही अभिनयापेक्षा तिच्या वक्तव्यांमुळे आणि परखडपणामुळे चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. आता तिच्यावर नेटकऱ्यांनी खालच्या पातळीवर केलेले आरोप अभिनेत्रीला सहन झालेले नाहीत. त्यामुळे तिनं नेटकऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. त्या नेटकऱ्याचे शब्द सेलिनाला तीव्र वेदना देणारे ठरले आहेत.

Also Read - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

त्या नेटकऱ्यानं असं म्हटलं आहे की, सेलिना ही एकमेव अभिनेत्री आहे की, जी अभिनेता फरदीन खान आणि त्याचे वडील फिरोज खान यांच्यासोबत अश्लील वर्तन करताना दिसली आहे. सेलिनानं जेव्हा हे ट्विट वाचले तेव्हा तिला संताप झाल्याचे दिसून आले. आणि तिनं त्या नेटकऱ्याला चांगलेच सुनावले आहे. तिनं म्हटलं आहे की, डियर संधू तुम्ही असे का बोललात माहिती नाही, पण अशाप्रकारे वक्तव्य करुन तुम्ही स्वताला मर्द म्हणवून घेत असाल तर तुम्हाला उपचाराची गरज आहे.

Celina Jaitley Controversy Fardeen Khan Father Feroz
Vidya kareena : वजनाचा विषय झाला अन् विद्या करीना कचाकचा भांडल्या

तुम्ही आता एक काम करा, डॉक्टरकडे जा आणि उपचार करुन घ्या. तुम्हाला त्याची गरज आहे. सेलिनानं त्या ट्विट वर अशा प्रकारे राग व्यक्त केला आहे. तिनं ट्विटरवर संबंधित युझर्सच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Celina Jaitley Controversy Fardeen Khan Father Feroz
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : 'जर माझा चित्रपट चालला नाहीतर मी...' सलमानचं मोठं वक्तव्य!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com