esakal | ईशान खट्टर आणि अनन्या पांडे स्टारर 'खाली पीली' सिनेमाला लागली सेन्सॉरची कात्री
sakal

बोलून बातमी शोधा

khali peeli

सेंन्सॉर बोर्डाने सिनेमातील अनेक सीन्सना कात्री लावली आहे. सेन्सॉर बोर्डाला सिनेमातील कित्येक सीन आणि डायलॉग्स अश्लिल आणि कामुक वाटत होते. 

ईशान खट्टर आणि अनन्या पांडे स्टारर 'खाली पीली' सिनेमाला लागली सेन्सॉरची कात्री

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- कित्येक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर ईशान खट्टर आणि अनन्या पांडे यांचा आगामी सिनेमा 'खाली पीली' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. असं म्हटलं जातंय की ओटीटीवर रिलीज होण्यासोबतंच बंगळुरु आणि गुरुग्राम येखील थिएटर्समध्ये देखील रिलीज केला जाणार आहे. थिएटरमध्ये रिलीज करण्यासाठी सिनेमाला सेंन्सॉर बोर्डाकडून सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे. आता यानंतर अशी माहिती समोर येत आहे की सेंन्सॉर बोर्डाने सिनेमातील अनेक सीन्सना कात्री लावली आहे. सेन्सॉर बोर्डाला सिनेमातील कित्येक सीन आणि डायलॉग्स अश्लिल आणि कामुक वाटत होते. 

हे ही वाचा: पायल घोष म्हणाली, पोलिसांकडे खोटं बोलला अनुराग, लाय डिटेक्टर आणि नार्को टेस्ट केली जावी  

बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, सिनेमातील काही डायलॉग्स असे आहेत ज्यावर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला होता. या डायलॉग्समध्ये शिवीगाळ करणारी अश्लील भाषा वापरली गेली होती. रिपोर्टमध्ये म्हटलंय की सिनेमातील 'तहस नहस' गाण्यातील कामुक सीन्स देखील कट केले गेले आहेत. याव्यतिरिक्त सेन्सॉर बोर्डाने सिनेमाच्या टीमला सुरुवातीला डिस्क्लेमर देण्यात यावं असे आदेश देखील दिले आहेत. या डिस्क्लेमरमध्ये असं लिहिलं जावं की सिनेमा कोणत्याही प्रकारच्या महिला आणि मुलांच्या शोषणाचं समर्थन करत नाही.

तसंच स्मोकिंगच्या सीन्सवेळी धुम्रपान विरोधी दिल्या जाणा-या मेसेजची फॉन्ट साईज देखील वाढवण्यासाठी सांगितलं आहे. सोबतंच सिनेमाच्या उत्तरार्धात सुरुवातीला धुम्रपानविरोधी जाहीरात देखील जोडली आहे. एवढे कट्स लावल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने २२ सप्टेंबरला सिनेमाला U/A सर्टिफिकेट दिलं आहे. आता संपूर्ण सिनेमा हा १ तास ५९ मिनिटांचा आहे. २ ऑक्टोबरला ओटीटीवर रिलीज होणा-या या सिनेमाचं सेन्सॉर वर्जनंच रिलीज केलं जाईल.  

censor board cuts many explicit scene and dialogues from ishaan ananya starrer khaali peeli  

loading image