चैतन्य ताम्हाणेला वेनिसनंतर दुसरा आंतरराष्ट्रीय सन्मान, 'द डिसायपल'साठी टोरोंटो फिल्म फेस्टीवलमध्येही केलं सन्मानित

chaitanya tamhane
chaitanya tamhane

मुंबई- मराठमोळा सिनेदिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेला त्याच्या 'द डिसायपल' सिनेमासाठी ४५ व्या 'टोरंटो आंतरारष्ट्रीय फिल्म फेस्टिवल'मध्ये 'एम्प्लिफाय वॉईस ऍवॉर्ड'ने सन्मानित केलं गेलं आहे. चैतन्यला हा पुरस्कार सिने दिग्दर्शक फिलीप लॅकोट यांच्या 'नाईट ऑफ द किंग्स' या सिनेमासोबत विभागून मिळाला आहे.

'ऍम्प्लिफाय वाईस ऍवॉर्ड्स' जुरीने 'द डिसायपल' सिनेमा खूप सुंदर असल्याचं म्हटलं. शनिवारी मीरा नायर यांच्या बीबीसी स्टुडिओ सिरीज 'अ सुटेबल बॉय'च्या सादरीकरणासोबत टीआयएफएफ २०२० संपन्न झाला. फिल्म फेस्टिवलच्या इतिहासात पहिल्यांदाच एका टेलिव्हिजन शोचं सादरीकरण झालं.

'द डिसायपल' या सिनेमाला 'वेनिस फिल्म फेस्टिवल'च्या ७७ व्या आवृत्तीत सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी पुरस्कार मिळाला. 'द डिसायपल'ला याच फिल्म फेस्टिवलमध्ये इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्सद्वारे 'इंटरनॅशनल क्रिटिक्स एवॉर्ड'ने सन्मानित केलं गेलं.

'द डिसायपल' या सिनेमात यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या शास्त्रीय संगीत तज्ज्ञांचं जग दाखवलं आहे. सिनेमात एका भारतीय संगीतकाराविषयी दाखवलं गेलं आहे जो त्याच्या कलेमध्ये शुद्धता आणण्याचा प्रयत्न करत असतो कारण त्याच्या वडिल आणि गुरुंकडून तो महान कलाकारांविषयीच्या गोष्टी ऐकत मोठा झालेला असतो. 'द डिसायपल' सिनेमासाठी मराठमोळ्या चैतन्य ताम्हाणेला मिळालेला हा दुसरा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.   

chaitanya tamhane film the disciple wins amplify voices award at toronto film festival  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com