Ankur Wadhave: चला हवा येऊ द्या फेम अंकुर वाढवे गोत्यात! नेमकं काय झालयं?

Ankur Wadhave
Ankur WadhaveEsakal
Updated on

'चला हवा येऊ द्या' हा शो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचत आहे. हा शो प्रेक्षकांच भरभरुन मनोरंजन करतो. हसवून लोकांना पार लोटपोट करुन सोडतं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली. यातच अंकुर वाढवे हा देखील चाहत्यांचा लाडका आहे.

चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी सर्वच कलाकारांना सोशल मिडियावर सक्रिय राहवे लागते. चाहतेही आपल्या आवडत्या चाहत्याच्या वैयक्तिक आयूष्याबद्दल जाणून घेण्याचीही उत्सूकता असते. मात्र सोशल मिडियावर जास्तचं सोशलं राहणं अंकुरला महागात पडलं आहे. सोशल मिडियाचे जितके फायदे आहेत तितकेच नूकसान कारकही आहे. याचाच प्रत्यय अंकुरला आलायं.

सेलिब्रिटिंचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक करण्याच प्रमाणही वाढलंय आणि यातचं अंकुरही अटकला आहे. कुण्यातरी हॅकरनं अंकुरचं फेसबुक अकाऊंटच हॅक केलंय. इतकचं नाही तर अंकुरचं फेसबुक अकाऊंट हॅक करुन त्यावर अश्लील गोष्टी पोस्ट केल्या जात आहे. ही गोष्ट जेव्हा अंकुरच्या लक्षात आली तेव्हा त्यानं थेट सायबर पोलिसांत याची तक्रार दाखल केली आहे. तसंच त्याच्यासोबत झालेल्या घटनेची माहिती त्यानं चाहत्यांना इन्स्टाग्रामवर पोस्ट करून दिली.

Ankur Wadhave
Tunisha Sharma: 'शिझानची आई माझ्या मुलीचा छळ...' तुनिषाच्या आईचे शिझानच्या कुटुंबावरही गंभीर आरोप

इंस्टाग्रामवर अंकुरनं एक फोटो शेअर केलाय. पोलिसांकडे केलेल्या तक्रार अर्जाची फोटोही शेअर त्यानी लिहिलं आहे की, मित्रानो माझे फेसबुक चे पेज काही दिवसांपासून हॅक झालेले आहे त्यावर जे पोस्ट होतंय त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही बऱ्याच मित्रांनी मला कॉल व मॅसेज करून याबद्दल माहिती देवून चिंता व्यक्त केली त्यासंबंधी मी आजच सायबर ला तक्रार दाखल केलीय काळजी नसावी आणि असच पाठीशी उभे रहा धन्यवाद! सतर्क रहा माझ्या या पेज वरून काहीही मॅसेज आला तर दुर्लक्षित करा नशिबाने अजून तसे कोणाला मॅसेज नाही आले. ही महिती माझ्या व तुमच्याही मित्रांपर्यंत पोहचवा.

Ankur Wadhave
Bigg Boss16: बिगबॉसच्या घरातील वाद नडणार...विकासला घरातून हाकललं?

नमस्कार हे माझे व्यायक्तिक फेसबुक पेज आहे गेल्या दोन तीन दिवसापासून हॅक झालंय आज पासून त्यावरून अश्लील फोटो प्रसारित होत आहे सध्या या पेज वर माझा काहीही कंट्रोल राहिलेला नाहीय त्यामुळे यावरून कोणाला पैश्यासंदर्भात मॅसेज आल्यास त्यावर विश्वास ठेवू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com