Tunisha Sharma: 'शिझानची आई माझ्या मुलीचा छळ...' तुनिषाच्या आईचे शिझानच्या कुटुंबावरही गंभीर आरोप

Tunisha Sharma
Tunisha SharmaEsakal

२४ डिसेंबर,२०२२ रोजी पालघर जिल्ह्यातील वसई येथे एका मालिकेच्या सेटवर अभिनेत्री तुनिषा शर्मा हिनं आत्महत्या केली होती. या प्रकरणी तुनिषाचा सहकलाकार अभिनेता शिझान खान याच्यावर तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. ३० डिसेंबर,२०२२ पर्यंत त्याला पोलिस कस्टडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. यादरम्यान आता तुनिषाच्या आईनं आज पत्रकार परीषद घेतली आहे.

या पत्रकार परिषदेत तुनिषाच्या आईने शीझान, त्याची आई व बहिणीवर गंभीर आरोप केले आहेत.

तुनिषाच्या आईने आरोपात म्हटलं आहे की, शीझान नशा करायचा, तुनिषाने स्वत: मला याबद्दल सांगितलं होतं. शीझानने फक्त तुनिषाचा वापर केला आणि तिला फसवलं. जेव्हा मी याबद्दल त्याला जाब विचारण्यासाठी गेले तेव्हा मी त्याचं काहीच करु शकत नाही, जे करायचं ते करा असं शीझान म्हणाला.

Tunisha Sharma
Tunisha Sharma: तिच्या हत्येसाठी शीझानच जबाबदार..कंगणा भडकली, पंतप्रधानाकडे केली मागणी...

जर त्याचे दुसऱ्या मूलीसोबत संबंध होते तर तो तुनिषासोबत का रिलेशनमध्ये आला, वयातील अंतर आणि धर्मामुळे दोघांचे ब्रेकअप झाले असं शीझान म्हणतोय, मग सुरुवातीलाच प्रेम करताना वयातलं अंतर- धर्म त्याला का कळला नाही? असे सवालही तुनिषाच्या आईनं निर्माण केले आहेत. शिझानची आई तुनिषाला त्रास देत असल्याचं देखील तुनिषाच्या आईनं पत्रकार परिषदेत म्हटलं. पूर्ण कुटुंबानं तिचा फक्त वापर केला .

तिच्याकडून महागडे गिफ्ट घेतले,शीझानच्या बोलण्यामुळं ती खचली होती. शीझानची आई तिला वारंवार फोन करुन तिला मानसिक त्रास देखील द्यायची असे गंभीर आरोप तुनिषाच्या आईनं शीझानच्या कुटुंबावर देखील केले आहेत.

Tunisha Sharma
Tunisha Sharma: ' हा मूर्खपणा...तुनिषाच्या मृत्यूला तिचं कुटुंबच जबाबदार...' शक्तीमान भडकला

आत्महत्येतेपुर्वी तुनिषाने आईला फोन केला होता, तिला ख्रिसमस साजरा करण्यासाठी चंदिगढला जायचं होतं. दोन दिवसांसाठी ती चंदिगढला जाणार होती. ती खुप खूश होती. मात्र अर्धा तासात असं काय घडलं की तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाउल उचललं,असा सवालही तुनिषाच्या आईनं पत्रकार परिषदेत उठवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com