chala hawa yeu dya actor kushal badrike birthday post for wife sunayana badrike
chala hawa yeu dya actor kushal badrike birthday post for wife sunayana badrikeSAKAL

Kushal Badrike: "घर घेताना मी तुझी पॉलिसी मोडली अन्...", कुशलची बायकोच्या वाढदिवसाला भावूक पोस्ट

कुशल बद्रिकेने त्याच्या बायकोच्या वाढदिवसासाठी खास पोस्ट लिहीली आहे

Kushal Badrike News: चला हवा येऊ द्या फेम अभिनेता कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असतो. कुशल बद्रिकेची पत्नी सुनैनाचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने कुशलने बायकोच्या वाढदिवशी तिच्यासाठी खास पोस्ट लिहीली आहे.

कुशलने पोस्ट लिहीताना त्यांच्या सहजीवनाच्या अनेक गोष्टींचा खुलासा केलाय. काय म्हणाला कुशल? वाचा पुढे.

(chala hawa yeu dya actor kushal badrike birthday post for wife sunayana badrike)

chala hawa yeu dya actor kushal badrike birthday post for wife sunayana badrike
Prathamesh Parab: ठरलं तर! या तारखेला होणार प्रथमेशचा साखरपुडा, गर्लफ्रेंडची भन्नाट पोस्ट व्हायरल

कुशलने बायकोसोबतचा फोटो पोस्ट करुन तिला शुभेच्छा देताना म्हटलंय की, "संसार म्हटलं की व्यवहार आला आणि व्यवहार म्हंटल की हिशोब .आता हिशोब लावला, “तुझ्या-माझ्या” नात्याचा. बापरेऽऽ! किती उधारी वाढली आहे माझ्यावर तुझी! आपल्या पहिल्या घराचं booking करण्यासाठी तुझी एकमेक असलेली policy मोडली होती आपण, आता पुन्हा नवीन घर घेता येईल, पण ती “ती वेळ” परत करण्याची policy अजून कोणत्याच company कडे नाही बघ."

कुशल पुढे लिहीतो, "दसऱ्याला “झेंडूची फूलं” परवडत नाहीत म्हणून देवा समोर नुसताच दिवा लाऊन साजरा केलेला दसरा आठवतोय. आता फुलांनी सडे सजवता येतील मला, पण तो दसरा तुला परत कसा करू ? सांग !
अक्षय तृतीयाला सोनं घ्यायचं , संक्रांतीला काळी साडी नेसायची अश्या सगळ्या “प्रथा” माहीत होत्या तुला, पण तुझा अवघा जन्म माझ्या “व्यथा” जपण्यात गेला यार…"

कुशल शेवटी लिहीतो, "आता परवा परवाचीच गोष्ट नाही का ? mental stress च्या नावाखाली मी रात्रभर टक्क जागा होतो आणि माझ्या उशाशी बसून तू माझ्या पाठी वरून हाथ फिरवत बसली होतीस….
ही तुझ्यातल्या आईची माया कसा परत करू शकणार आहे मी ?
माझ्यासाठी जन्म वाहणाऱ्या मुली तुझ्या कोणत्याच भावनेची परतफेड करता येणार नाही मला. तुझं खूप देणं लागतो पण जाणिवां पलिकडे काहीही देता येणार नाही मला. sorry
आणि happy birthday ( सुकून )"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com