
'तुझ्या धावपळीला साष्टांग दंडवत' प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चत..
CHANDRAMUKHI : 'चंद्रमुखी' या आगामी चित्रपटात 'नैना चंद्रापूरकर' च्या भूमिकेत प्राजक्ता माळी (prajakta mali) दिसणार असून तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक केले जात आहे. या चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकर म्हणजे 'चंद्रा' आणि प्राजक्ता म्हणजेच 'नैना' यांची सवाल जवाबाची लावणी सध्या भलतीच लोकप्रिय होत आहे. बऱ्याच वर्षांनी अशी सवाल जवाबाची लावणी चित्रपटात आली आहे. काल २९ एप्रिल रोजी हा चित्रपट रिलीज झाला असून प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळत आहे.
हेही वाचा: १५ वर्षांची असताना उर्फी जावेद पॉर्न साईटवर.. धक्कादायक माहिती समोर..
या चित्रपटाबाबत प्राजक्ता माळीने एक पोस्ट तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केली आहे. यामध्ये तिने अमृता खानविलकरचे (amruta khanvilkar) विशेष कौतुक केले आहे. या पोस्टसह प्राजक्ताने गुलाबी रंगाच्या साडीत एकी फोटो अपलोड केला आहे. हा फोटो 'चंद्रमुखी'च्या प्रीमियरचा आहे. या फोटोला एक खास कॅप्शन तिने दिले आहे. “चंद्रमुखी प्रिमियर, अम्मो.. अमृता खानविलकर तुझ्या आयुष्यातला हा पहिला मुख्य भूमिका असलेला चित्रपट आणि तू त्यात अप्रतिम काम केलं आहेस. तुझा हा कधीच न पाहिलेला अवतार. यासोबतच तू आता एक बेन्चमार्क सेट केलं आहेस की चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आपण किती मेहनत केली पाहिजे. तुझ्या धावपळीला साष्टांग दंडवत प्रणाम, चंद्रमुखीवर प्रेक्षकांच्या प्रेमाचा धो धो वर्षाव होवो ह्याच शुभेच्छा...”
हेही वाचा: राडा, लफडी आणि चिक्कार मनोरंजन घेऊन 'बिग बॉस मराठी' पुन्हा येतंय..
या कौतुकामागे कारणही खास आहे. आजवर झालेल्या मराठी चित्रपटांमध्ये चंद्रमुखी हा सर्वाधिक प्रमोशन केलेला चित्रपट ठरला आहे. अमृता खानविलकरने या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खूप मेहनत घेतली. अगदी गावागावात फिरण्यापासून विमानतळावर नाचण्यापर्यंत सर्व स्तरावर हे प्रमोशन झाले. एकही माध्यम असे नाही जिथे अमृता पोहोचली नाही. तिची अडीच वर्षांची ही मेहनत आहे. 'चंद्रा'ला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तिने विशेष कष्ट घेतले आहेत.
Web Title: Chandramukhi Prajakta Mali Instagram Post For Amruta
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..