१५ वर्षांची असताना उर्फी जावेद पॉर्न साईटवर.. धक्कादायक माहिती समोर..| urfi javed's photo uploaded on porn site when she was 15 years | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१५ वर्षांची असताना उर्फी जावेद पॉर्न साईटवर.. धक्कादायक माहिती समोर..

१५ वर्षांची असताना उर्फी जावेद पॉर्न साईटवर.. धक्कादायक माहिती समोर..

आपल्या अतरंगी फॅशन स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असणारी सोशल मीडिया सेंसेशन उर्फी जावेद(Urfi Javed) कायम चर्चेत असते. रोज नवी फॅशन, नवे कपडे आणि नवा लुकी यामुळे उर्फीने नेटकऱ्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ वरही ती झळकली होती. पण आता उर्फीने अशी एक गोष्ट सांगितली आहे जी ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे.

हेही वाचा: राडा, लफडी आणि चिक्कार मनोरंजन घेऊन 'बिग बॉस मराठी' पुन्हा येतंय..

पॉर्न साईट हा शब्द ऐकला तरी प्रत्येकाचे डोळे उंचावतात. त्याच पॉर्न साइटबाबत आज उर्फी बोलली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उर्फीने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. उर्फी १५ वर्षांची असताना तिचा फोटो हा पॉर्न साईटवर लीक झाला होता. उर्फीने नुकतीच आरजे अनमोल आणि अमृता राव यांच्या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी उर्फी म्हणाली, “मी १५ वर्षांची असताना ऑफ शोल्डर टॉप परिधान केला होता आणि तेव्हा मी लखनऊमध्ये राहत होते. त्यावेळी लखनऊमध्ये असे कपडे कोणी परिधान करत नव्हते. एवढचं काय तर असे कपडे मिळतही नव्हते. मी घरीच तसा टॉप बनवला होता. तो टॉप परिधान करून मी माझा फोटो फेसबूकवर अपलोड केला आणि तोच फोटो कोणीतरी पॉर्न साइटवर अपलोड केला.”

पुढे उर्फी म्हणाली, “तेव्हा मी अवघी १५ वर्षांची होते. परिस्थितीचा सामना कसा करावा हेच मला त्यावेळी कळत नव्हतं. पण कठीण परिस्थितीला सामोरं गेल्याशिवाय तुम्ही तुमच्यातील क्षमतेला आणि धैर्याला ओळखू शकत नाही. एकतर त्याविरोधात लढा किंवा त्याचा स्वीकार करा किंवा मग जीव द्या. मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात मी अयशस्वी ठरले आणि त्यानंतरच मी लढायचे ठरवले.”

हेही वाचा: Photo : विमानतळावर 'चंद्रमुखी'चीच हवा.. पाहा खास फोटो..

उर्फीने ‘बेपनाह’, ‘बडे भैय्या की दुल्हनियाँ’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘ये है आशिकी’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय. उर्फी सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. उर्फीचा हा धक्कादायक अनुभव कसा होता याचा व्हडिओ सोबत जोडला आहे. उर्फीविषयी तुम्हाला काय वाटत हे नक्की कमेंट करून सांगा.

Web Title: Urfi Javeds Photo Uploaded On Porn Site When She Was 15

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top