Sushant Singh Rajput | रियाने अनेकदा गांजा खरेदी करुन सुशांतला दिला; NCB चा खळबळजनक दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rhea sushant
रियाने अनेकदा गांजा खरेदी करुन सुशांतला दिला; NCB चा खळबळजनक दावा

रियाने अनेकदा गांजा खरेदी करुन सुशांतला दिला - NCB

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आता आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. एनसीबीने दावा केला आहे की सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेंड रियाने अनेकवेळा गांजा खरेदी करुन त्याला दिला. काल या प्रकरणातली सुनावणी पार पडली. ३५ आरोपींविरोधात या प्रकरणात आरोपपत्र दाखल कऱण्यात आलं होतं. (Sushant Singh Rajput Death News)

हेही वाचा: सुशांतसिंह आत्महत्यावेळी केलेले वार्तांकन कायद्याचे उल्लंघन करणारे: उच्च न्यायालय

सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने आपला भाऊ शौविक आणि अन्य आरोपींकडून अनेकदा गांजा खरेदी केला आणि सुशांतसिंह राजपूतला (Sushant Singh Rajput) दिला होता. एनसीबीने दावा केला आहे की रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), तिचा भाऊ शौविक आणि सगळ्या आरोपींनी एकमेकांसोबत मार्च २०२० पासून डिसेंबर २०२० पर्यंत कारस्थान रचलं होतं, जेणेकरुन ते बॉलिवूड आणि उच्चभ्रू सोसायटीमध्ये ड्रग्सचं वाटप आणि खरेदी विक्री करू शकतील. आरोपींनी मुंबईमध्ये ड्रग्ज तस्करीला वित्तपुरवठा केला, तसंच गांचा, चरस, कोकेनसारख्या अमली पदार्थांचा वापरही केला. यासाठी सर्व आरोपींच्या विरोधात कलम २७ आणि २७ ए, २८ आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

हे आरोप निश्चित करण्याआधी न्यायालय सर्व आरोपींना दोषमुक्त करण्यासाठीच्या याचिकेवर विचार करेल. NDPS अंतर्गत प्रकरणाची सुनावणी करणारे विशेष न्यायाधीश व्ही जी रघुवंशी यांनी या प्रकरणातल्या सुनावणीसाठी २७ जुलै ही ताऱीख दिली आहे. आता पुढची सुनावणी १५ दिवसांनंतर होईल.

Web Title: Charges Submitted Against Rhea Chakroborty Of Providing Ganja To Sushant Singh Rajput

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..