बादशहाच्या विरोधात 446 पानांची चार्जशीट फाईल Entertainment News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बादशहा
फेक व्हयूज मिळवणे रॅपर बादशहाला पडले महागात!

'फेक व्ह्यूज'चा बादशाह? ७४ लाख रुपये मोजून ७२ लाख फेक व्ह्यूज

sakal_logo
By
प्रणाली मोरे

आज कमी वेळात अधिकाधिक लोकांपर्यंत थेट पोहोचण्याचं माध्यम म्हणजे सोशल मीडिया. पण ह्याच सोशल मीडियामुळे अनेक चुकीचे प्रकारही होऊ लागले आहेत. मग अगदी पैसे देऊन फेक फॉलोअर्स विकत घेणा-यांपासून पेड व्हयूज मिळवेपर्यंत अपराध करणा-यांची मजल गेली आहे. सोशल मीडियावर अपलोड केलेला एखादा व्हिडिओ जेव्हा रातोरात लाखो-करोडो व्हयूज मिळवून हीट होतो तेव्हा नकळत आपणही त्या कलाकृतीला आवडो किंवा न आवडो डोक्यावर घेतोच. पण त्या लाखो-करोडो फेक व्ह्यूज मागचं सत्य किती दिवस लपून राहणार. अखेर पोलिसांची नजर त्यावर पडतेच आणि मग सुरू होतो धरपकडीचा खेळ.

हेही वाचा: इंजिनिअर बनून रॅट रेस हवी होती कुणाला?

अशीच घटना घडलीय सुपरहीट रॅपर बादशहाच्या बाबतीत. बादशहानं आतापर्यंत अनेक बॉलीवूड सिनेमांमधून हीट गाणी दिली आहेत,तसंच त्याचे काही अल्बम्सही हीट झाले आहेत. पण ह्याच बादशहानं आपल्या प्रसिद्ध झालेल्या 'पागल' ह्या गाण्यासाठी 74 लाख रक्कम खर्च करून 72 लाख पेड व्हयूज मिळविले आहेत. अखेर मुंबई पोलिसांना ह्याचा छडा लागलाच आणि बादशहा विरोधात तब्बल 446 पानी चार्जशीट दाखल करण्यात आली. या संदर्भात बादशहाने मात्र आपण असे काही केले नसल्याचा दावा केलाय. आपले मुंबई पोलिसांशी बोलणे सुरू आहे आणि या चौकशीसंदर्भात आपण पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत असेही त्याने म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिस सोशल मीडियावरील फेक फॉलोअर्स आणि पेड व्हयूज संदर्भातील गंभीर प्रकरणांवर चौकशी करीत आहेत. याच प्रकरणात रॅपर आदित्य प्रतिक सिंह उर्फ बादशहा याचीही चौकशी सुरू होती. बादशहा आपण असे काही केले नसल्याचं म्हणत असला, तरी पोलिसांचं म्हणणं आहे की बादशहाने पेड वह्यूजसाठी आपण 74लाख भरल्याचं कबूल केलंय. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांच टिमने सांगितले की, बादशहाने आपलं प्रसिद्द झालेलं 'पागल' हे गाणं वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट व्हावं म्हणून हे केलं आहे.

गेल्यावर्षी बादशहाने असाही दावा केला होता की त्याच्या गाण्यावर केवळ 24 तासात 75 मिलियन व्हयूज आले होते. पण गूगल आणि युट्यूबने त्याच्या ह्या दाव्याला अमान्य केले होते.

मुंबई पोलिसांकडे बादशहासोबतच आणखी जवळ-जवळ 175 हाय प्रोफाईल सेलिब्रिटींची लिस्ट आहे जे अशापद्धतीने पेड व्हयूज मिळवित आहेत. यासंदर्भात 15 जुलैला एका इंटरनॅशन रॅकेटच्या पेड व्हयूजचा छडा लागला होता. ही गोष्ट तेव्हा समोर आली जेव्हा गायिका भूमी त्रिवेदीने आपल्या इंस्टाग्रामवरील फेक प्रोफाईलची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात आणखी चौकशी सुरू केली असता बादशहा हे मोठं नाव समोर आलं. अद्याप बादशहाने पूर्णतः या गोष्टीचा स्विकार न करता यावर स्पष्टीकरण देणे टाळले आहे.

loading image
go to top