विकी कौशलला रॅट रेसमध्ये रहायचं नव्हतं म्हणून इंजिनिअरिंग सोडलं Entertainment News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकी कौशल

इंजिनिअर बनून रॅट रेस हवी होती कुणाला?

sakal_logo
By
प्रणाली मोरे

आजच्या घडीचा बॉलीवूडमधला सक्षम अभिनेता म्हणून विकी कौशलचं नाव घेतलं तर चुकीचं नक्कीच ठरणार नाही. विकीनं आजपर्यंत मसान,मनमर्झिया,सरदार उधम,उरी,राझी अशा एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमांमधून काम केलंय. सध्या तो त्याच्या आगामी सिनेमाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. नुकतंच त्याने डिस्कवरी प्लस वाहिनीवरील 'द वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स' या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. तेव्हा त्याने आपल्या वैयक्तिक जीवनाविषयी अनेक खुलासे केले.

हेही वाचा: दिवंगत इरफान खानला गायचं होतं 'तुम होती तो ऐसा होता'...

या कार्यक्रमात तो म्हणाला,''खरंतर मी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होतो. माझे वडील श्याम कौशल जरी फिल्म इंडस्ट्रीत अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम करीत असले तरी त्यांची इच्छा होती की मी इंजिनिअर व्हावं. कारण त्याआधी माझ्या घरात कुणीच नऊ ते पाच असा जॉब केला नव्हता,ना महिन्याच्या पगाराचा पे चेक कोणाला माहित होता ना हॅप्पी फॅमिली टाईम कुणी एन्जॉय केलं होतं. त्यामुळे वडीलांसोबत मलाही मी इंजिनिअर व्हावं असं वाटत होतं. म्हणजे कसं छान नोकरी,महिन्याचा पगाराचा चेक,आठवड्यातून दोन दिवस सुट्टी असली की फॅमिली टाईमचा आनंद हे गणित डोक्यात फीट बसलं होतं आणि तेव्हा ते छानही वाटायचं. पण इंजिनिअरिंगच्या दुस-या वर्षाला असताना एका कंपनी व्हिझिट दरम्यान तिथल्या लोकांना सतत कम्प्युटरसमोर काम करताना पाहून मला वाटलं मी या जागेसाठी बनलो नाही. मला जे हवंय ते इथे मिळणार नाही. रॅट रेसमध्ये मला स्वतःची फरफट करून घ्यायची नाही. त्यानंतर मी ठरवून निर्णय घेतला अनं अभिनयक्षेत्रात माझं शिक्षण आणि पुढचा प्रवास सुरू झाला".

हेही वाचा: 'हिमालयातील मादक पदार्थाचं सेवन कंगनानं केलंय'

सध्या विकी कौशल सिनेमांसोबतच गर्लफ्रेंड कतरिना कैफसोबत त्याच्या लग्नाच्या अफवांमुळे अधिक चर्चेत आहे. डिसेंबरच्या दुस-या पंधरवड्यात त्यांचं लग्न होणार असल्याची चर्चा आहे. पण या दोघांकडूनही याविषयी कोणतंच कन्फर्मेशन आलेलं नाही. त्यामुळे ते लग्न कधी करणार याविषयी चाहत्यांची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचलीय.

loading image
go to top