'चार्ल्स से मिलना मतलब...' बॉलीवूडच्या रणदीपचा थरकाप उडवणारा अनुभव |Charles Sobhraj | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Charles Sobhraj

Charles Sobhraj: 'चार्ल्स से मिलना मतलब...' बॉलीवूडच्या रणदीपचा थरकाप उडवणारा अनुभव

Charles Sobhraj Controversial personality : तो माझ्यापासून फक्त सात फुटांच्या अंतरावर होता. आतापर्यत त्याच्याविषयी बऱ्याचजणांकडून ऐकले होते. तो काही चांगल्या कामासाठी प्रसिद्ध नव्हताच. एखादा माणूस इतका हिंसक कसा काय असू शकतो याविषयी मला खूप कुतूहल होते. जेव्हा त्याला एकदाचा भेटलो तेव्हा मात्र तो भलताच खतरनाक असल्याचे दिसून आले.

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुडानं कुख्यात चार्ल्स सोबराजच्या आयुष्यावर आधारित एका चित्रपटामध्ये काम केले होते. त्या चित्रपटाचे नाव होते 'मैं और चार्ल्स'. तेव्हा चार्ल्स हा त्यानं केलेल्या गुन्ह्यांमुळे चर्चेत होता. बिकीनी किलर म्हणून त्याचे नाव झाले होते. त्यामुळे बॉलीवूडला देखील त्याच्यावर आधारित चित्रपट तयार करण्याची प्रेरणा मिळाली नसती तरच नवल म्हणावे लागेल. २०१५ मध्ये चार्ल्स सोबराजवर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फार काही चालला नाही.

Also Read: सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

रणदीप हुड्डानं त्यामध्ये चार्ल्सची भूमिका साकारली होती. त्याच्या भूमिकेला मात्र प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. प्रेक्षकांनी देखील त्याच्या या वेगळ्या भूमिकेचे कौतूक केले होते. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी रणदीप हा चार्ल्सला भेटण्यासाठी नेपाळमध्ये गेला होता. त्याची भेट झाल्यानंतर, त्याच्याशी बराचवेळ संवाद साधल्यानंतर रणदीप भलताच प्रभावित झाला होता. एका मुलाखतीमध्ये त्यानं आपला आणि चार्ल्सचा काय संवाद झाला होता. त्याच्याविषयी आपल्याला काय जाणवले याच्या आठवणी सांगितल्या होत्या.

हेही वाचा: Deepika Padukone : दीपिकाच्या 'त्या' बिकिनीची किंमत माहितंय का?

बिकीनी किलर म्हणून कुख्यात असलेल्या चार्ल्स हा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो २००३ पासून नेपाळच्या तुरुंगात शिक्षा भोगतो आहे. आता कोर्टानं त्याच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. अशातच सोशल मीडियावर चार्ल्स सोबराजविषयीच्या वेगवेगळया गोष्टींना उधाण आले आहे. रणदीपनं सांगितलं होतं की, बिकीनी किलर चार्ल्सशी बोलायचं म्हणजे खूप अवघड काम होतं. 'चार्ल्स से मिलना मुश्किल नहीं है, नामुमकिन है.' अशा शब्दांत त्याचे वर्णन करावे लागेल. आम्ही चार्ल्सला त्याच्या चित्रपटाचे काही पोस्टर्स पाठवले होते. जेणेकरुन त्यानं ते साईन करुन परत द्यावे अशी अपेक्षा होती. त्यानं आमचं ऐकलं आणि ते पोस्टर्स पाठवून दिले.

हेही वाचा: Lookback 2022: ...म्हणून टॉलीवूड ठरलं 'बाप' अन् बॉलीवूड झालं 'फ्लॉप'! का मिळाली टॉलीवूडला प्रेक्षकांची दाद

मला त्याच्याशी बोलण्याची संधी मिळाली होती. त्यामध्ये मी केवळ त्याच्यापासून केवळ सात फुटांच्या अंतरावर होतो. आमच्या चित्रपटाचा निर्माता तर त्याला पाहून उड्या मारायला लागला होता. त्याला त्या गोष्टीचा खूप आनंद झाला होता. मी त्याचा रोल करणार आहे असे म्हटल्यावर त्याला खूप आनंद झाला होता. त्यानं माझं अभिनंदन करुन आम्हाला खूप शुभेच्छाही दिल्या होत्या. पण काही म्हणा तो खूप खतरनाक माणूस होता. असे मला सांगावे लागेल. हे रणदीप सांगायला विसरला नाही.