Smita Deo: सुनेच्या हातचा पांढरा रस्सा चाखला आणि रडू लागले रमेश देव.. जाणून घ्या हा खास किस्सा..

रमेश देव यांच्या सूनबाई स्मिता देव यांनी चला हवा येऊ द्या मध्ये सांगितली एक आठवण..
chef smita deo talks about her father in law actor ramesh deo in chala hawa yeu dya
chef smita deo talks about her father in law actor ramesh deo in chala hawa yeu dyasakal
Updated on

गेली कित्येक वर्ष महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना भरभरून हसवणारा कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या.. झी मराठी वरील या कार्यक्रमाने आजवर मनोरंजनात कोणतीही कसर सोडली नाही. या कार्यक्रमात अनेक कलाकार, काही नावीन्यपूर्ण काम करणारे चेहरे भेटीस येत असतात.

नुकत्याच झालेल्या भागात महाराष्ट्राच्या अन्नपूर्णा म्हणजे सोशल मिडीयावरून पाककृती शिकवणाऱ्या सुगरण महिला सहभागी झाल्या होत्या. यामध्येच एक नाव होते ते ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांची सून आणि अभिनय देव यांची पत्नी स्मिता देव.

यावेळी गप्पा मारताना स्मिता देव यांनी खाद्य पदार्थासोबतच अनेक वैयक्तिक आठवणी सांगितल्या. यामध्ये रमेश देव यांची जेवणाची आवड-निवड, आणि एक भन्नाट किस्साही त्यांनी सांगितला.

(chef smita deo talks about her father in law actor ramesh deo in chala hawa yeu dya)

chef smita deo talks about her father in law actor ramesh deo in chala hawa yeu dya
Kaccha Badam: ‘कच्चा बादाम’फेम गायक भुवनची अवस्था बिकट! फसवणूक करून चोरले गाण्याचे हक्क, आता फिरतोय..

या कार्यक्रमात स्मिता म्हणाल्या की, 'रमेश देव कोणत्याही प्रकारचं डाएट करत नव्हते. त्यांना जे आवडायचं ते पदार्थ ते मनसोक्त खायचे. त्यांना गोड पदार्थ आणि विशेष म्हणजे घरी केलेले पदार्थ प्रचंड आवडायचे. त्यांचं खाण्यावर मनापासून प्रेम होतं त्यामुळे त्यांना हवे ते पदार्थ ते आवर्जून खायचे.'

पुढे त्या म्हणाल्या, 'एके दिवशी घरी पाहुणे येणार होते. त्यांच्यासाठी मी घरी पारंपरिक असा तांबडा पांढरा रस्सा करत होते. त्यावेळी बाबा किचनमध्ये आले आणि त्यांनी मला विचारलं 'छोटी तू काय करत आहेस. त्याची चव मला चाखायला दे.' मी त्यांना तांबडा पांढरा रस्सा चव घेण्यासाठी दिला. तो चाखल्यानंतर ते रडू लागले. नंतर त्यांनी मला सांगितलं की, ही चव घेतल्यावर त्यांना त्यांच्या आईनं केलेल्या रस्सा आठवला.' हे सांगताना स्मिता स्वतः खूपच भावुक झाल्या होत्या.

स्मिता यांनी आपल्या सासऱ्यांच्या म्हणजेच रमेश देव यांच्या अनेक आठवणी या कार्यक्रमात सांगितल्या. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे २ फेब्रुवारी २०२२ रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते. स्मिता देव या अभिनय देव यांच्या पत्नी आहेत. याशिवाय त्या प्रसिद्ध शेफ देखील आहेत.

स्मिता देव यांनी कारवार ते कोल्हापूर व्हाया मुंबई हे पाकशास्त्रावर आधारीत पुस्तक लिहिलं आहे. तसंच त्याचं स्वतःचं युट्यूब चॅनेल देखील आहे. सोशल मीडियावर त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com