
छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा विकी कौशल आणि रश्मिका मंदाना स्टारर 'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. चार दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १३० कोटींची बंपर कमाई केली आहे. या सिनेमाचे सकाळी अगदी ६ पासूनचे शो सुद्धा हाऊसफुल आहेत तर लोक उशीरापर्यंतचे शो सुद्धा पाहायला जात आहे. प्रेक्षक सिनेमा पाहतानाचे किंवा त्यांना आवडलेल्या क्षणांचे व्हिडिओ शेअर करत आहेत.