Chhath Puja 2022: बॉलीवुडमधील हे बिहारी कलाकार साजरी करणार छट पूजा..

उद्या छट पूजा, त्यानिमित्ताने बिहारवासीय कलाकारांनी सांगितल्या आठवणी..
Chhath Puja 2022: Pankaj tripathi to ratan raajput these celebrities have deep faith in chhath festival
Chhath Puja 2022: Pankaj tripathi to ratan raajput these celebrities have deep faith in chhath festivalsakal
Updated on

chhath pooja 2022: संपूर्ण भारतात छठ उत्सव साजरा केला जातो,महाराष्ट्रात जरी हा उत्सव साजरा केला जात नसला तरी पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये छठ पूजा वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. या सणाला विशेष महत्त्व आहे. फिल्म इंडस्ट्रीत काही सेलिब्रिटी बिहारचे रहिवासी आहेत, त्यांच्या छठ पूजेशी संबंधित अनेक आठवणी आहेत.

(Chhath Puja 2022: Pankaj tripathi to ratan raajput these celebrities have deep faith in chhath festival)

Chhath Puja 2022: Pankaj tripathi to ratan raajput these celebrities have deep faith in chhath festival
Bigg Boss Marathi 4: घरात फाटाफूट! अमृता धोंगडे आणि तेजूच्या मैत्रीत दुरावा..

आज २८ऑक्टोबर पासून छठ पूजेला सुरुवात झाली आहे. उत्तर भारतात विशेषत: बिहारमध्ये छठला विशेष महत्त्व आहे आणि तो मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. बिहारच्या मूळ कलाकारांनी बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीत झेंडा रोवला आहे. आज जरी या कलाकारांना त्यांच्या व्यस्त वेळामध्ये छठला गावी जाता येत नसले, तरी त्यांची गाढ श्रद्धा आहे आणि ते मुंबईतही या जमेल तसं हा सण साजरी करतात.

Chhath Puja 2022: Pankaj tripathi to ratan raajput these celebrities have deep faith in chhath festival
Neeraj Chopra: चित्रपटासाठी उचलला भाला! 'ब्लॅक पँथर'मध्ये नीरज चोप्राची एंट्री..

अभिनेता पंकज त्रिपाठीने आपल्या आई बद्दल आठवणी सांगितल्या, या दिवशी त्यांची आई उपवास ठेवायची. पंकज त्रिपाठी मूळचे बिहारमधील गोपालगंजचे असून ते अनेकदा त्यांच्या गावी जात असतात. तर रतन राजपूत ही पाटणाची रहिवासी आहे. लॉकडाऊनमध्ये रतन बराच वेळ आपल्या गावी गेली होती. रतनसाठी छठ सणाला विशेष महत्त्व आहे. रतन राजपूत ही सगळ्या परंपरा पाळून हा सण साजरा करते.

मनोज बाजपेयी यांचा जन्म बिहारमधील पश्चिम चंपारण येथे झाला. अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केल्यानंतर मनोज मुंबईत बिझी असला तरी त्याच्या गावात साजरा होणारा हा सण आजही त्याला आठवतो. साराभाई व्हर्सेस साराभाई फेम अभिनेता राजेश कुमार यांनी गेल्या वर्षी छठ पूजा केली होती. पटना येथील रहिवासी असलेल्या राजेशने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com