Neeraj Chopra: चित्रपटासाठी उचलला भाला! 'ब्लॅक पँथर'मध्ये नीरज चोप्राची एंट्री..

बहुचर्चित हॉलीवुड चित्रपट ब्लॅक पँथर लवकरच प्रदर्शित होणार असून त्यात भारतीय खेळाडू नीरज चोप्रा झळकणार आहे.
Neeraj Chopra features in Black Panther: Wakanda Forever’s promotional teaser
Neeraj Chopra features in Black Panther: Wakanda Forever’s promotional teasersakal
Updated on

neeraj chopra: मार्वलचा 'ब्लॅक पँथर - वाकांडा फॉरएव्हर' हा हॉलीवुड चित्रपट पुढील महिन्यात चित्रपटगृहात येणार आहे. भारतातही हा चित्रपट चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन सध्या जोरात सुरू आहे. पण सध्या एक वेगळाच आणि महत्वाचा चेहरा चा चित्रपटच्या टीझर मधून समोर आला आहे.

(Neeraj Chopra features in Black Panther: Wakanda Forever’s promotional teaser)

मार्वलने चित्रपटाचा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा आहे. प्रोमोमध्ये नीरज त्याचे भालाफेक कौशल्य दाखवत आहे. नीरज चोप्राच्या या एंट्रीने भारतीयांच्या मनात चार चांद लावले आहे.

Neeraj Chopra features in Black Panther: Wakanda Forever’s promotional teaser
Amruta Subhash:आलिया नंतर आता अमृता सुभाषच्या प्रेग्नंसीची चर्चा! ४३व्या वर्षी होणार आई?

या बद्दल नीरज म्हणतो " चित्रपटाची कथा एका जबरदस्त योद्ध्याची आहे. ही कथा एका वीराबद्दल आहे जो आपल्या लोकांसाठी आणि देशासाठी लढण्यास तयार आहे. एक खेळाडू म्हणून, भारताचे प्रतिनिधित्व करणे, माझ्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. आणि जसा मी माझ्या खेळासाठी शेवट पर्यंत लढतो तसेच या चित्रपटामध्ये दाखविले आहे .त्याचा एक भाग बनून मला आनंद होत आहे.

'जसा ब्लॅक पँथर आपल्या स्वप्नाशी एकनिष्ठ आहे त्याचप्रमाणेच, लोकांनी त्यांची स्वप्ने सोडू नयेत. मी स्वतः मार्वलचा चाहता असल्याने मी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे.' असेही त्याने म्हंटले आहे.

ब्लॅक पँथर - वाकांडा फॉरएव्हरचे दिग्दर्शन रायन कूगलर यांनी केले आहे. केविन फीगे आणि नॅट मूर यांनी याची निर्मिती केली आहे. इंग्रजी व्यतिरिक्त हा चित्रपट ११ नोव्हेंबरला तमिळ, तेलुगु आणि हिंदी भाषेत थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राणी रामोंडा, शुरी, म्बाकू, ओकोये ,डोरा मिलाजे राजा ,अँजेला बॅसेट, लेटिशिया राइट, विन्स्टन ड्यूक, डॅनाई गुरिरा आणि फ्लोरेन्स कसुंबा या पात्रांमध्ये दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com