Children’s Day 2023: या टिव्ही कलाकारांची मुलं सोशल मिडियावर तुफान व्हायरल...

असे टीव्ही स्टार जे लहानपणापासून सोशल मीडियावर स्टार आहेत.
Children’s Day 2023
Children’s Day 2023आेोकोत

14 नोव्हेंबर हा दिवस देशभरात बालदिन म्हणुन साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त भारतात बालदिन साजरा केला जातो. नेहरुंना लहान मुलं फार आवडायची. त्यामुळे जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर त्यांचा वाढदिवस हा बालदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बालदिन या खास प्रसंगी बॉलीवूडपासून ते टेलिव्हिजन स्टार्सपर्यंत प्रत्येकजण सोशल मीडियावर आपल्या सुंदर फोटोंसह बालपणीच्या आठवणींना उजाळा देत आहे. आज बालदिनाच्या या खास प्रसंगी आम्ही तुम्हाला टीव्हीच्या प्रसिद्ध स्टार किड्सची ओळख करून देणार आहोत, जे लहान वयातच खुप लोकप्रिय झाले आहेत.

लक्ष्य सिंह लिंबाचिया

भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांचा मुलगा लक्ष्य हा खुप लोकप्रिय आहे. भारती त्याला प्रेमाने गोला म्हणते. गोलाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो भारती सोशल मिडियावर शेयर करत असते. भारतीचे चाहते त्याच्यावर खूप प्रेम करतात. गोलाचाही इंस्टाग्रामवर चांगलाच फॅन क्लब आहे.

तारा भानुशाली

या यादित दुसरं नाव आहे ते जय भानुशाली आणि माही विज यांची मुलगी तारा भानुशालीचे. तारा लहानपणापासूनच सोशल मीडिया स्टार आहे. ताराचा जन्म 2019 मध्ये झाला होता आणि आता ती चार वर्षांची आहे. ताराचे सोशल मीडियावर अकाउंट आहे. माही विज देखील तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. ताराच्या व्हिडिओंना लाखो लाईक्स मिळतात. लहानपणापासूनच तारा स्टार झाली आहे.

जायन धूपर

कुंडली भाग्यफेम करण लुथरा म्हणजेच धीरज धूपरने ऑगस्ट 2022 एका मुलाचे स्वागत केले आहे. धीरज धूपर यांच्याप्रमाणेच त्यांचा मुलगा जायन लहानपणापासून सोशल मीडिया लोकप्रिय आहे. धीरज अनेकदा आपल्या मुलासोबतचे सुंदर फोटो सोशल मिडियावर शेयर करत असतो.

लियाना आणि दिविशा

गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी हे टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. यांनी लग्नाच्या 11 वर्षानंतर एप्रिल 2022 मध्ये पहिली मुलगी लियानाचे आणि नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांची दुसरी मुलगी दिविशा चौधरीचे स्वागत केले. आता या स्टार जोडप्याची मुलगी दिविशा आणि लियाना सोशल मिडियावर खुप चर्चेत असतात. देबिना अनेकदा तिच्या मुलीसोबत फोटो शेअर करत आहे.

सूफी एम

नकुल मेहता आणि जानकी पारेख यांना ही एक मुलगा आहे. निळे डोळे आणि सोनेरी केस असलेल्या सूफीचा फॅन बेस तगडा आहे. नकुल मेहता अनेकदा सूफीचे फोटो सोशल मिडियावर शेयर करत असतो. सूफी सोनेरी डोळे आणि तपकिरी केस आणि आपल्या क्यूटनेसने सर्वांना वेड लावतो.

किश्वर मर्चंट आणि सुयश राय यांनीही 2021 मध्ये लाडक्या लेकाचे स्वागत केले आहे. किश्वर अनेकदा तिचा मुलगा निर्वैरचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते.

तर मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांची मुले खुप देखील लोकप्रिय आहेत. अंशुमन विचारेची मुलगी अन्वी ही देखील नेहमी चर्चेत असते. अंशुमन आपल्या लाडक्या लेकीचे अनेक क्यूट फोटो - व्हिडीओ शेअर करत असतो.

तर यात दुसरं नाव आहे ते प्रवीण तरडेंच्या मुलाचे. परार्ध तरडे हा धर्मवीर चित्रपटात झळकलाय. प्रवीण मुलासोबत गडकिल्ल्यावर जाऊन त्याला शिवरायांच्या गोष्टी सांगत असतात. ज्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com