'अंन्ग्रेजी मिडीयम' नंतर आता येणार 'चायनीज मिडीयम'

वृत्तसंस्था
Thursday, 12 March 2020

'हिंदी मिडीयम' आणि 'अन्ग्रेजी मिडीयम' या सिनेमानंतर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येत्या काही काळात 'चायनीज मिडीयम' हा सिनेमा देखील येऊ शकतो.

'हिंदी मिडीयम' आणि 'अन्ग्रेजी मिडीयम' या सिनेमानंतर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येत्या काही काळात 'चायनीज मिडीयम' हा सिनेमा देखील येऊ शकतो. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हिंदी मिडीयम' या सिनेमाने चीनमध्ये चांगली कमाई केल्याने निर्माते चांगलेच खुश झाले होते आणि म्हणूनच या आठवड्यात प्रदर्शित होणारा 'अन्ग्रेजी मिडीयम' देखील लवकरच चीन मध्ये प्रदर्शित करण्याचा त्यांचा विचार सुरू आहे.

Happy Birthday Shreya : ...म्हणून लीला भन्साळींनी घेतला श्रेया घोषालचा शोध!

या सिनेमाचे निर्माते दिनेश विजान यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, 'हिंदी मिडीयम चीनमध्ये प्रदर्शित झाला आणि सिनेमा हिट झाला..'अन्ग्रेजी मिडीयम' देखील लवकरच चीनमध्ये प्रदर्शित होईल..'हिंदी मिडीयम' प्रदर्शित झाल्यानंतर 4 आठवड्याने जेव्हा मी चीनमधील एका हॉटेल मध्ये जेवायला गेलो होतो तेव्हा तेथील एक महिला वेटर ला कळालं की या सिनेमाचे निर्माते इथे आले आहेत तेव्हा ती मला भेटायला आली आणि तिने सांगितलं की तीने तिच्या मुलीसोबत हा सिनेमा पहिला आणि तो तिला खूपच भावला..याच गोष्टीमुळे मला विचार करायला भाग पाडलं..'

Happy Birthday Shreya : पहिल्याच सिनेमासाठी श्रेया ठरली बेस्ट प्लेबॅक सिंगर

होमी अडजानिया दिग्दर्शित 'अन्ग्रेजी मिडीयम' सिनेमात इरफान खान, करीना कपूर, राधिका मदन आणि दीपक डोबारियाल मुख्य भूमिकेत असून हा सिनेमा 13 मार्चला प्रदर्शित होणारे...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chinese medium will be released after Angrezi medium