
चिरंजीवी यांनी सांगितलंय की त्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. त्यामुळे एकंदरीतंच आता लोकांमध्ये याविषयी आणखी संभ्रम निर्माण झाला आहे.
मुंबई- साऊथ सिनेमाचे मेगास्टार चिरंजीवी यांचा कोविड-१९ रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती दिली होती. मात्र आता त्यांनी सांगितलंय की त्यांचा कोविड-१९ रिपोर्ट चुकीचा होता ज्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निदान केलं गेलं होतं. आता चिरंजीवी यांनी सांगितलंय की त्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. त्यामुळे एकंदरीतंच आता लोकांमध्ये याविषयी आणखी संभ्रम निर्माण झाला आहे.
हे ही वाचा: 'ऐतराज'च्या १६ वर्षांनंतर प्रियांका चोप्राने केला मोठा खुलासा
अभिनेते चिरंजीवी यांनी स्वतः याबाबत सोशल मिडियावर माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन त्यांचा कोविड-१९ रिपोर्ट निगेटीव्ह आल्याचं म्हटलंय. त्यांनी लिहिलंय, 'डॉक्टरांच्या ग्रुपने माझ्या तीन वेगवेगळ्या टेस्ट केल्या आणि आता मी कोविड-१९ निगेटीव्ह आलो आहे. पहिली टेस्ट एका खराब आरटी पीसीआर किटने तपासणी केल्याने पॉझिटीव्ह आढळून आली होती त्यामुळे तो रिपोर्ट चुकीचा होता.'
चिरंजीवी यांनी त्यांची काळजी करणा-या आणि लवकर ठिक होण्यासाठी प्रार्थना करणा-या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी लिहिलंय, 'या दरम्यान तुमच्याकडून दाखवल्या गेलेल्या प्रेमासाठी मी तुम्हाला धन्यवाद देतोय.'
A group of doctors did three different tests and concluded that I am Covid negative & that the earlier result was due to a faulty RT PCR kit. My heartfelt thanks for the concern, love shown by all of you during this time. Humbled ! pic.twitter.com/v8dwFvzznw
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) November 12, 2020
याआधी चिरंजीवी यांनी ट्विट करत 'आचार्य' सिनेमाच्या शुटींगआधी कोरोनाची टेस्ट केली असता ती पॉझिटीव्ह आल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांचे चाहत्यांना धक्का बसला होता. सोशल मिडियावर चिरंजीवी यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणारे हॅशटॅग्स ट्रेंड झाले होते.
chiranjeevi has tested covid 19 negative now clarifies his earlier result was false positive