'ऐतराज'च्या १६ वर्षांनंतर प्रियांका चोप्राने केला मोठा खुलासा

दिपाली राणे-म्हात्रे
Friday, 13 November 2020

प्रियांकाच्या 'ऐतराज' या सिनेमाला १६ वर्ष पूर्ण झाली आहेत. प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार, करिना कपूर स्टारर हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरला. तसंच प्रियांकाच्या परफॉर्मन्सची देखील खूप वाहवा झाली.

मुंबई-  बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एका आयकॉनिक भूमिका साकरल्या आहेत. सिनेमात हिरोईनच्या मुख्य भूमिकेसोबतंच प्रियांकाने अनेक सिनेमांमध्ये व्हिलनची भूमिका साकारली आहे. यातलंच एक उदाहारण म्हणजे 'ऐतराज' या सिनेमातील बोल्ड भूमिका. नुकतंच प्रियांकाच्या 'ऐतराज' या सिनेमाला १६ वर्ष पूर्ण झाली आहेत. प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार, करिना कपूर स्टारर हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरला. तसंच प्रियांकाच्या परफॉर्मन्सची देखील खूप वाहवा झाली.

हे ही वाचा: निक्की तंबोलीने जान सानूवर लावले जबरदस्ती किस करत असल्याचे आरोप, जाननेही केला पलटवार

'ऐतराज' सिनेमाला १६ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने खास पोस्ट केली आहे. या व्हिडिओमध्ये काही क्लिपिंग्स पाहायला मिळतायेत. यासोबतंच प्रियांका या व्हिडिओमध्ये सांगतेय की सिनेमाच्या दिग्दर्शकाने या भूमिकेत जिवंतपणा आणण्यासाठी तिला प्रेरित केलं. तसंच ती ही भूमिका आत्तापर्यंतच्या सगळ्यात कठीण भूमिकांपैकी एक असल्याचं म्हटलंय. 

हा व्हिडिओ शेअर करताना प्रियांकाने लिहिलंय, ''२००४  एका अभिनेत्रीच्या रुपात एक वर्ष. मी अब्बास-मस्तान यांच्या ऐतराज या थ्रीलर सिनेमात सोनिया रॉय ही भूमिका साकारली. ही भूमिका मी आत्तापर्यंत साकारलेल्या भूमिकांपैकी एक बोल्ड भूमिका होती जी एक मोठी रिस्क देखील होती कारण त्यावेळी मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवीन होते.  मी खूप घाबरले होते कारण माझ्या आतला कलाकार सांगत होता की मी काहीतरी मनोरंजक करु आणि सोनिया ही तशीच भूमिका होती. '' 

प्रियांकाने तिच्या या पोस्टमध्ये सोनियाच्या पात्राबद्दल भरभरुन लिहिलं आहे. तिच्या व्हिडिओ क्लिपिंग्स देखील या भूमिकेतील असल्याने खास चाहत्यांसाठी तिने ही पोस्ट शेअर केली आहे.   

priyanka chopra post on 16 years of aitraaz  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: priyanka chopra post on 16 years of aitraaz