ख्रिस्तोफर नोलानच्या ''टेनेट'' चित्रपटाने केला धूर; कोरोनातही ठरला ''सुपरहिट''

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 9 October 2020

ख्रिस्तोफर नोलनच्या ‘टेनेट’ या चित्रपटानं सर्वांना वेड लावले आहे. पहिल्या तीन आठवड्यात ‘टेनेट’ या हॉलिवूडपटाने तब्बल ३०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची कमाई केली आहे. 

मुंबई - ख्रिस्तोफर नोलानच्या चित्रपटांचा वेगळा आणि स्वतंत्र असा प्रेक्षकवर्ग आहे. त्याच्या येणा-या प्रत्येक चित्रपटाची रसिक आतूरतेने वाट पाहत असतात. नेहमी चाकोरीबाहेरील चित्रपट बनविणा-या नोलानचा नुकताच ‘टेनेट’नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अपेक्षेनुसार त्यालाही जाणकार प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. कोरोनाच्या काळात निर्माते, दिग्दर्शक यांच्यासमोर चित्रपट प्रदर्शनाचे आव्हान असताना नोलानच्या नव्या चित्रपटाची गोष्टच वेगळी म्हणावी लागेल.

कोरोना असताना ज्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे त्याच्या माध्यमातून त्याने कोट्यवधीची कमाई केली आहे. युरोप आणि अमेरिकेतील काही मोजके देश सोडले तर सर्व ठिकाणचे सिनेमागृह सध्या बंदच आहेत. मात्र मोजक्या सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होऊनही ख्रिस्तोफर नोलनच्या ‘टेनेट’ या चित्रपटानं सर्वांना वेड लावले आहे. पहिल्या तीन आठवड्यात ‘टेनेट’ या हॉलिवूडपटाने तब्बल ३०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची कमाई केली आहे.

सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे जगभरातील लाखो लोकांना त्याची बाधा झाली आहे. यात कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीचा जबरदस्त आर्थिक फटका सिनेसृष्टीलाही बसला आहे. अखेर लॉकडाउन उघडताच शक्य तितक्या देशांमध्ये चित्रपट प्रदर्शित झाला. अन् आश्चर्याची बाब म्हणजे प्रेक्षकांनी देखील चित्रपटाला खुप चांगला प्रतिसाद दिला. कोरोना काळातही या चित्रपटाने तब्बल ३०० दशलक्ष डॉलर्सची कमाई केली.कोरोनाचा सतत येणारा अडथळा यामळे आतापर्यत तीन वेळा टेनेटच्या रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. 

'बाहुबली' प्रभासच्या सिनेमात महानायक अमिताभ यांची एंट्री, प्रभासने दिली प्रतिक्रिया

या चित्रपटाची निर्मितीसाठी २०० दशलक्ष डॉलर्स खर्च करण्यात आले होते.  नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉनसारख्या अनेक नामांकित ओटीटी प्लॅटफॉर्मने या चित्रपटाला ऑनलाईन प्रदर्शित करण्याची ऑफर निर्मात्यांना दिली होती. परंतु दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलान त्यासाठी तयार नव्हता. 

अक्षयच्या ''लक्ष्मी बॉम्ब'' चा फाडू ट्रेलर पाहिलायं ? ; मग एकदा बघाच

टेनेट हा वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी आहे. ‘इन्सेप्शन’, ‘इंटरस्टेलर’ ‘बॅटमॅन ट्रायोलॉजी’, ‘डंकर्क’, यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या ख्रिस्तोफर नोलन याने त्याची ही भव्य दिव्य कलाकृती प्रेक्षकांसमोर ठेवली आहे.   त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. अखेर हा चित्रपट युरोपमध्ये प्रदर्शित झाला आहे. भारतातील अनेक मोठ्या कलाकारांनी युरोपमधील सिनेमागृहांत जाऊन हा चित्रपट पाहिला.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Christopher Nolans Tenet Crosses get huge success during pandemic situation