सलमानला अडवणाऱ्या CISF अधिकाऱ्यावर कारवाई नाही, तर..

याप्रकरणी CISF कडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
salman
salman

अभिनेता सलमान खानला Salman Khan मुंबई विमानतळावर अडवणाऱ्या CISF जवानावर कारवाई झाल्याची चर्चा होती. घटनेसंदर्भात माध्यमांसमोर व्यक्त झाल्याने त्याचा मोबाइल फोन जप्त करण्यात आला, असं म्हटलं जात होतं. मात्र आता याप्रकरणी CISF कडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. 'सलमानला विमानतळावर अडवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली नसून उलट त्याने कर्तव्य चोख बजावल्यामुळे बक्षिस देण्यात आलं आहे', असं ट्विट CISF च्या अधिकृत अकाऊंटवरून करण्यात आलं आहे. अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ Katrina Kaif हे आगामी 'टायगर ३' Tiger 3 या चित्रपटाच्या शूटिंगसाठी परदेशी रवाना झाले. परदेशी रवाना होतानाचा सलमानचा मुंबई विमानतळावरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक CISF अधिकारी कागदपत्र तपासण्यासाठी सलमानला आत प्रवेश करण्यापासून अडवताना दिसत आहे.

'संबंधित ट्विटमधील मजकूर चुकीचा असून त्यात काही तथ्य नाही. किंबहुना, संबंधित अधिकाऱ्याला त्याच्या कर्तव्यपालनासाठी योग्य बक्षिस देण्यात आले आहे', असं ट्विट सीआयएसएफच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आले आहे.

salman
दैवाने दिले; कर्माने नेले! KBC विजेता सुशील कुमारची दुर्दैवी कहाणी

अधिकाऱ्यावर कारवाईची चर्चा

सलमानला विमानतळावर अडवल्यानंतर CISF अधिकारी सोमनाथ मोहंती हे माध्यमांशी बोलले होते. माध्यमांशी बोलणं हे प्रोटोकॉलचं उल्लंघन आहे. यापुढे त्यांनी कोणत्याही माध्यमांशी संपर्क साधू नये, म्हणून त्यांचा फोन जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती समोर येत होती.

व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांचे कमेंट्स

सलमान कारमधून बाहेर पडताच तोंडाला मास्क लावून विमानतळाच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने चालू लागतो. प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच त्याला एक अधिकारी अडवतो आणि कागदपत्रांविषयी विचारतो. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव केला. सेलिब्रिटीच्या ग्लॅमरला न भुलता आपलं कर्तव्य बजावणारा अधिकारी, म्हणून त्याची स्तुती केली. 'गणवेशाची ताकद', अशी कमेंट एकाने केली. तर 'अधिकाऱ्याने ज्याप्रकारे सेलिब्रिटीला अडवलं, ते आवडलं', असं दुसऱ्याने लिहिलं होतं.

'टायगर ३' या आगामी चित्रपटाची शूटिंग पुढील ४५ दिवस परदेशातील विविध पाच ठिकाणी केली जाणार आहे. यामध्ये ऑस्ट्रिया आणि टर्की यांचाही समावेश आहे. हा संपूर्ण अॅक्शन सीक्वेन्स शूट करण्यासाठी परदेशातील शूटिंगचं नियोजन करण्यात आलं आहे. 'टायगर ३' हा 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' या चित्रपटांच्या सीरिजमधला तिसरा भाग आहे. पहिल्या भागाचं दिग्दर्शक कबीर खान तर दुसऱ्या भागाचं दिग्दर्शन अली अब्बास जफरने केलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com